Petrol-Diesel Price Update | पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल का? पेट्रोलिय मंत्र्यांचं मोठे वक्तव्य..
Petrol-Diesel Price Update | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पण देशात अद्यापही पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत. यासंदर्भात आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे..
Petrol-Diesel Price Update | आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Prices) मोठी घसरण झाली आहे. पण देशात अद्यापही पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) जैसे थे आहेत. यासंदर्भात आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. पेट्रोलियम मंत्री (Minister of Petroleum) हरदीप सिंह यांनी या पेट्रोल-डिझेलच्या दरांविषयी सरकारचा काय निर्णय आहे त्याची माहिती दिली आहे.
तीन महिन्यांपूर्वी कपात
21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) घटवले होते. त्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं होतं.
पेट्रोल,डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होण्याची चर्चा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरणीचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 ते 3 रुपयांची घसरण होईल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कच्चे तेल 90 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास होते, जूनमध्ये त्याची किंमत 125 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. ब्रेंट कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 92.84 डॉलरवर व्यापार करत आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त नाहीच
दरम्यान पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळणार नाही, असे संकेत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले आहेत.
कंपन्यांचे नुकसान भरून काढणार
भारतीय तेल कंपन्या, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारशी कपात करणार नाहीत असे ते म्हणाले. तेल कंपन्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अधिक वेळ हवा आहे, असं सांगत त्यांनी इंधन स्वस्ताईच्या चर्चांना पूर्ण विराम दिला.
शहर | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
अहमदनगर | 106.62 | 93.13 |
अकोला | 106.14 | 92.69 |
औरंगाबाद | 108 | 95.96 |
जळगाव | 106.15 | 92.68 |
मुंबई | 106.31 | 94.27 |
कोल्हापूर | 106.47 | 93.01 |
नांदेड | 108.48 | 94.94 |
नागपूर | 106.18 | 92.72 |
पुणे | 106.01 | 92.53 |
परभणी | 108.79 | 95.21 |
किंमत दररोज संध्याकाळी 6 वाजता बदलतात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. या नव्या किंमती सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होते.