Petrol Diesel Price : 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव
राष्ट्रीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून आत्तापर्यंत म्हणजेच 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे.
दिल्ली – राष्ट्रीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून आत्तापर्यंत म्हणजेच 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल 118.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच आता डिझेल देखील 102.64 रुपये प्रति लिटरच्या पुढे विकले जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर आता 103.41 वर पोहोचला आहे. तर डिझेल 95 रुपयांच्या जवळ आहे. महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 3 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग झाले आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 103.41 per litre & Rs 94.67 per litre respectively today (increased by 80 paise)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 118.41 (increased by 84 paise) & Rs 102.64 (increased by 85 paise). pic.twitter.com/oVaUVY2BTc
— ANI (@ANI) April 3, 2022
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात काय आहे आजचा पेट्रोल आणि डिझेल दर
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आता 120.96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 103.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कृपया लक्षात घ्या की, स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 118.41 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 102.64 रुपये झाला आहे. गेल्या 13 दिवसांत पेट्रोलचे दर 8 रुपयांनी वाढले आहेl. गेल्या 22 मार्चपासून तब्बल १० वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. रविवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे ८५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल ८ रुपयांची वाढ झाली आहे.
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 118 102 ठाणे 117.68 100.48 सातारा 118.63 101.33 सांगली 118.34 101.08 कोल्हापूर 118.51 101.25 लातूर 119.26 101.95 औरंगाबाद 119.78 102.45 नागपूर 118.44 101.18
पुढील निवडणुकीपर्यंत पेट्रोल 275 रुपये प्रतिलिटर होणार!
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. पुढील निवडणुका येईपर्यंत पेट्रोलचा दर 275 रुपये प्रतिलिटर असेल. त्यांनी ट्विट करून सांगितले की, जनता म्हणत आहे की रोज 80 पैसे किंवा सुमारे 24 रुपये पेट्रोलचे दर महिना-महिना वाढतच राहिले. तर येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांदरम्यान, 7 महिन्यांत पेट्रोलचा दर 175 रुपयांच्या आसपास असेल.
13 दिवसांत 11 वेळा भाव वाढले आहेत
22 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत 13 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे देशभरातील किमती स्थिर होत्या.