Petrol-Diesel Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सलग तीसऱ्या दिवसी इंधनाचे दर स्थिर
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर (Fuel Price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, दर स्थिर आहेत.
Today Petrol-Diesel Price : भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर (Fuel Price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, दर स्थिर आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर राहिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलच्या दरात 5 रुपये तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात झाली होती. तेव्हापासून इंधनाचे दर चार महिने स्थिर होते. मात्र 22 मार्चपासून इंधनाच्या दरात वाढ होण्यासा सुरुवात झाली. गेल्या सोळा दिवसांमध्ये देशात इंधनाचे दर प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर असल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर असून, डिझेलसाठी प्रति लिटर मागे 96.67 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर एवढे आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 110.85 आणि 100.94 रुपये लिटर आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार इंधनाच्या दारत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात आजचे राज्यातील पेट्रोल, डिझेलचे भाव. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 120.27 व 102.97 रुपये एवढी आहे. पुण्यात देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, पेट्रोल प्रति लिटर 120.13 तर डिझेलचा दर 102.83 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर 121.14 रुपये तर डिझेल प्रति लिटर 103.81 रुपये आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 120.51 तर डिझेल 103.19 रुपये लिटर आहे.
कच्च्या तेलाच्या भावात घसरण
दिलासादायक बातमी म्हणजे कच्च्या तेलाच्या दरामध्ये देखील घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर तब्बल पंधरा दिवसांनंतर 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण हे देखील देशात सलग तीन दिवस इंधनाच्या किमती स्थिर राहण्याचे कारण असू शकते. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर पडल्याचे दिसून येत आहे. जवळपास सर्वच वस्तुंमध्ये दरवाढ झाली असून, महागाईने उच्चांक गाठला आहे.
संबंधित बातम्या
नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका; आरबीआयची अॅक्सिस, आयडीबीआय बँकेवर कारवाई
Inflation: पेट्रोल, डिझेलची दरवाढ सर्वसामान्यांच्या मुळावर, महागाईत भरमसाठ वाढ
सीएनजी महागला आता टॅक्सीचे भाडे वाढवा; मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी