Petrol Diesel price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून शनिवारी इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel price updates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग 45 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. मात्र अशाही स्थितीत देशात पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर (Diesel price) स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजी, एलपीजीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. चालू महिन्यात एलपीजीचे दर दोनदा वाढवण्यात आले आहेत. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. या काळात पेट्रोल, डिझेलचे दर लिटरमागे दहा रुपयांनी वाढले. मात्र सहा एप्रिलपासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 रुपये असून, डिझेलचा रेट प्रति लिटर 104. 50 रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर प्रति लिटर 120.40 रुपये तर डिझेलचा दर 103.73 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 104. 50 रुपये आहे.
प्रमुख महानगरातील दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये प्रति लिटर पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 115.12 आणि 99.83 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा रेट प्रति लिटर 110.85 रुपये तर डिझेलचा रेट 100.94 रुपये लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा भाव प्रति लिटर 104.77 रुपये आहे.
इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन
केंद्राकडून इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने गेल्या वर्षी चार नोव्हेंबरला पेट्रोल लिटर मागे पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर काही राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या राज्यांनी अद्यापही व्हॅट कमी केला नाही त्यांनी व्हॅट कमी करावा असे आवाहन केंद्र सरकाराच्या वतीने करण्यात आले आहे.