Petrol Diesel Rate Today : मुंबईत पेट्रोल 120 रुपये लीटर! डिझेलचा आजचा दर काय? जाणून घ्या

भारतासह संपूर्ण जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतींची चिंता सगळ्यांना सतावते आहे.

Petrol Diesel Rate Today : मुंबईत पेट्रोल 120 रुपये लीटर! डिझेलचा आजचा दर काय? जाणून घ्या
पेट्रोल डिझेलचे आजचे दर Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 7:33 AM

मुंबई : तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर (Petrol Diesel Rate Today) जारी केले आहेत. सलग 37 दिवसांपासून इंधनाचे (Fuel Rates) दर हे स्थिर असल्याचं पाहायला मिळालंय. आजही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. दर गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून स्थिर असल्यानं इंधनाचे दर आता कमी होणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (IOC) आपल्या वेबसाईटवरुन नवे दर जारी केले आहेत. या दरांमध्ये गेल्या 37 दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई पेट्रोलचा दर 120 रुपये लीटर आहे. तर डिझेलचा दर 105 रुपयांनी विकलं जातंय. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या दरम्यान असून डिझेलचही शंभरीच्या पार गेलेलं आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 रुपये असून, डिझेलचा दर 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे. उपराजधानी नागूपरमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.40 आणि 103.73 रुपये लिटर आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 106 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये तर डिझेलचा किंमत प्रति लिटर 104. 50 रुपये आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीची चिंता

भारतासह संपूर्ण जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतींची चिंता सगळ्यांना सतावते आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती जोपर्यंत आवाक्यात येणार नाहीत, तोवर महागाईचा भडका सुरुच राहील, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. जगात दोन हजारपेक्षाही अधिक वस्तूंची निर्मिती करताना कच्च्या तेलाचा वापर प्रामुख्यानं केला होता. या सर्व वस्तू दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या वापरातील असल्यानं त्याचा थेट फटका महागाईवर होतोय. त्यामुळे कच्चं तेल हे फक्त पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरच नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावरही तितकाच परिणाम करतंय.

महागाईचा भडका

महागाईचा दर एप्रिल मध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वीच मे 2014 मध्ये महागाईचा दर 8.32% वर पोहोचला होता. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या (Inflation Rate) तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. नियमित आहारातील खाद्यपदार्थांपासून इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गेल्या 8 वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन महिन्यात सीएनजी भावात पाच वेळा वाढ नोंदविली गेली आहे.

चालू वर्षी मार्च महिन्यात गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढविले होते. त्यासोबतच राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवरुन 950 रुपयांवर पोहोचली होती. आता ही किंमत 999 रुपयांच्याही पार गेली आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.