AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price | दिलासा… सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत (Petrol Diesel Price Today 26 February).

Petrol-Diesel Price | दिलासा... सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर
Petrol Price Today
| Updated on: Feb 26, 2021 | 9:36 AM
Share

मुंबई : किरकोळ व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने आज ‘भारत बंद’ (Bharat Bandh) पुकारला आहे (Petrol Diesel Price Today 26 February). या बंदमागे एक कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीही आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. मात्र, आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. तरीही पेट्रोल-डिझेलच्या दर रेकॉर्ड लेव्हलवर आहेत (Petrol Diesel Price Today 26 February).

मंगळवारी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण बुधवारी आणि आज गुरुवारीही दरांमध्ये फारसे बदल झालेले दिसले नाहीत. तसेच, आज शुक्रवारीही पेट्रोल डिझेलचे दर स्थिरावलेले आहेत.

दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रतिलिटर

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.34 प्रतिलिटर

ठाणे – 96.86 प्रतिलिटर

पुणे – 97.47 प्रतिलिटर

नागपूर – 97.84 प्रतिलिटर

सांगली – 97.26 प्रतिलिटर

सातारा – 97.81 प्रतिलिटर

औरंगाबाद – 97.93 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.45 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.44 प्रतिलिटर

ठाणे – 86.61 प्रतिलिटर

पुणे – 87.21 प्रतिलिटर

नागपूर – 88.99 प्रतिलिटर

सांगली – 87.04 प्रतिलिटर

सातारा – 87.57 प्रतिलिटर

औरंगाबाद – 87.89 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.22 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

Petrol Diesel Price Today 26 February

संबंधित बातम्या :

मुंबईत महागाईचा भडका, पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.