Petrol Diesel Price Today : सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले

देशात पेट्रोल-ढिझेल दरवाढीमुळे असंतोषाचा आगडोंब उसळला आहे. सलग 16 दिवसांत 14 व्या इंधन दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. पैशांनी दरवाढ करत सरकारने सर्वसामान्यांचा जबरदस्त खिसा कापला. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत. पण 7 आणि 8 एप्रिल रोजी इंधन दरवाढ करण्यात आलेली नाही.

Petrol Diesel Price Today : सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले
सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:54 AM

(Petrol Diesel Price Today) देशात पेट्रोल-ढिझेल दरवाढीमुळे असंतोषाचा आगडोंब उसळला आहे. सलग 16 दिवसांत 14 व्या इंधन दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. पैशांनी दरवाढ करत सरकारने सर्वसामान्यांचा जबरदस्त खिसा कापला. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत. पण 7 आणि 8 एप्रिल रोजी इंधन दरवाढ (Hike in Fuel) करण्यात आलेली नाही. 6 एप्रिलच्याच किंमती आज लागू आहेत. मोठ्या शहरात 6 एप्रिल रोजीचेच इंधन दर लागू आहेत. सहाजिकच गेल्या पंधरवाड्यापासून सुरु असलेल्या दरवाढीच्या सत्राला ब्रेक लागल्याने कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा (Relief) मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 120.51 रुपये तर डिझेलचे भाव 104.77 रुपये आहेत. तर नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.47 रुपये आहे. डिझेल प्रति लिटर 103.19 रुपये आहे.

oilprice.com च्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 101 डॉलर प्रति बॅलर होते. शुक्रवारी WTI Crude चे दर 96.55 डॉलर तर ब्रेंट क्रुडचे भाव 101 डॉलर होते. तर नैसर्गिक वायुचे दरात वाढ होऊन ते 6.37 डॉलरवर पोहचले आहेत.

ईटी नाऊ स्वदेशला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. या अहवालानुसार महागड्या तेलाच्या किमतीपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने देशातील प्रमुख तेल विपणन कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली नाही आणि ती अशीच वाढत राहिली तर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात येईल, जेणेकरून जनतेची महागड्या इंधनांपासून सूटका होईल. याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्यास सांगितले आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दरवाढ

  1. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपये आहे.
  2. ठाण्यात पेट्रोल प्रति लिटर 119.87 रुपये तर डिझेल प्रति लिटर 102.56 रुपये आहे.
  3. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत 120.27 रुपये तर डिझेलचे भाव 102.97 रुपये आहे.
  4. पुण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 120.13 तर डिझेलचे दर 102.83 रुपये आहे
  5. कोल्हापुरात आज दर जैसे थे म्हणजे 120.11 रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि 102.84 रुपये प्रति लिटर डिझेल असेल
  6. लातूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.86 रुपये तर डिझेल प्रति लिटर 103.56 रुपये आहे.
  7. औरंगाबादमध्ये आज पेट्रोल प्रति लिटर 121.14 रुपये तर डिझेल प्रति लिटर 103.81 रुपये आहे.
  8. परभणी शहरात पेट्रोल 122.03 रुपये प्रति लिटरवर आहे. तर डिझेल प्रति लिटर 104.68 रुपये आहे.
  9. अकोल्यात आज पेट्रोल प्रति लिटर 120.61 रुपये तर डिझेल भाव 103.33 रुपये प्रति लिटर आहे.
  10. नागपूरमध्ये पेट्रोल 113.75 रुपये प्रति लिटर तर आज डिझेल प्रति लिटर 103.19 रुपये आहे.

Solapur MNS : सोलापुरातही मशिदीसमोर हनुमान चालिसा नाही, मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, भोंग्याचा प्रश्नच नाही

Aurangabad | मराठवाड्यात हल्ल्याचे सत्र सुरूच, Nanded हत्याकांडानंतर औरंगाबादेत व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

CCTV | हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.