Petrol-Diesel Price : Valentine Day ला इंधन स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या आजचा भाव

Petrol-Diesel Price : आज प्रेमवीरांच्या खिशाला झळ बसणार की त्यांना इंधन मिळणार स्वस्त? जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती कमी होत आहेत किंवा स्थिर आहेत. आज त्याचा फायदा तुम्हाला होणार का?

Petrol-Diesel Price : Valentine Day ला इंधन स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या आजचा भाव
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:00 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाचा भाव (Crude Oil Price) गेल्या 24 तासात स्थिर आहेत. काही दिवसांपासून कच्चे तेलाच्या किंमतीत पडझड सुरु आहे. त्याचा देशातंर्गत किरकोळ पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर (Petrol-Diesel Price) ही त्याचा परिणाम झाला आहे. काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तफावत दिसत आहे. 10 ते 40 पैशांपर्यंत किंमतीत फरक फडला आहे. आज अनेकांची मनोरथ पूर्ण होत आहे किंवा होणार आहेत. अनेकांनी त्यासाठी खास प्लॅन केला असेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी काहींना लॉंग ड्राईव्हवर जायचे असेल. वाहनाची टाकी फुल्ल करण्याअगोदर पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत ते पाहा. कच्चा तेलाचे भाव 24 तासांत फारसे बदलले नाही. ब्रेंट क्रूडचा भाव 85.87 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर झाला आहे. तर डब्ल्यूटीआयचा भाव 79.25 डॉलर प्रति बॅरल आहे.

सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर देत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  3. अहमदनगर पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.96 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 106.57 तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 108.33 तर डिझेल 94.79 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 107.19 आणि डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 107.68 तर डिझेल 94.16 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.06 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.47 आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.52 रुपये तर डिझेल 93.04 रुपये प्रति लिटर आहे

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.