Today Petrol Price : गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, मोदी सरकारचा मास्टर प्लॅन

Today Petrol Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कपात होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकार मास्टरकार्ड फेकण्याच्या तयारीत आहे.काय आहे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा मास्टरप्लॅन

Today Petrol Price : गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, मोदी सरकारचा मास्टर प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 8:40 AM

नवी दिल्ली : आनंदवार्ता, नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून रडविणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) कमी होणार आहेत. आता ही माहिती सूत्रांनी नाही तर दस्तूरखुद्द पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी (Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. डिझेलच्या किंमती वाढल्याने माल वाहतूक महागली. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीत झाला आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती कमी झाल्या अथवा त्याला सक्षम पर्याय मिळाल्यास देशातील महागाई काबूत ठेवण्यासाठीची केंद्र सरकारची कसरत थांबेल. एका वर्षांनी देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) होऊ घातल्या आहेत. काही राज्यातही विधानसभा निवडणुका लागतील. त्याअगोदरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये कपातीची खेळी खेळणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आता याप्रकरणात केंद्र सरकारची बाजू पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडली आहे. हरदीप सिंह पुरी यांनी इंडिया एनर्जी वीकमध्ये याविषयीची माहिती दिली. देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी भारत जिथे स्वस्तात कच्चे तेल मिळेल, तिथून ते खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने रशियाशी व्यापारी संबंध तोडण्यासाठी पश्चिमी देश आणि अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढविण्यात आला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर ठाम राहिले. आताही स्वस्त इंधनासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रशियाकडून भारत केवळ 0.20 टक्के कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करत होता. त्यानंतर आता हा वाटा 25 टक्क्यांवर पोहचला आहे. भारत रशियाकडून दररोज 909403 बॅरलहूनही अधिक कच्चे तेल आयात करत आहे. आता कच्चे तेल मिळविण्यासाठी भारताने इतर देशांशीही हातमिळवणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर देत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.