Petrol Diesel Rate Today : या शहरात स्वस्त तर येथे महागले पेट्रोल-डिझेल, काय आहे आजचा भाव
Petrol Diesel Rate Today : राज्यातील काही शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. तर काही ठिकाणी इंधनाच्या किंमती वधारल्या आहेत. दोन दिवसांत भाव जैसे थे होते. आज काय आहे भाव जाणून घ्या..
नवी दिल्ली : जून महिना आता एका आठवड्यांनी संपणार आहे. पण या महिन्यातही देशातील नागरिकांना तेल उत्पादक कंपन्यांनी कुठलाही दिलासा दिलेला नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तेल कंपन्या एका लिटरमागे रग्गड कमाई करत आहेत. गेल्या वर्षभरापासून दरवाढ न केल्याचा आव आणत ही लूट सुरु आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्तात मिळून ही या कंपन्यांनी वाहनधारकांच्या तोंडाला पानं पुसली आहे. इंधन दरवाढ केली नाही, अशी लोणकढी थाप मारत कंपन्या, सरकारचं चांगभलं होत आहे. युरोपासह इतर राष्ट्रांना डिझेलसह इतर पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या कंपन्या फायद्यात आहेत. देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) आज असा बदल झाला. एक लिटरसाठी खिशाला इतकी झळ बसेल. भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.
आज सकाळी भाव जाहीर जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले.
कच्चा तेलाची उसळी आज कच्चा तेलाने (Crude Oil Price) उसळी घेतली. बेंच मार्क ब्रेंट क्रूड ऑईल सध्या 77.04 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 72.47 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत.
भाव एका SMS वर
- भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
- देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
- त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
- पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
- इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
- इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
- बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
- त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
- त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
- एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns), (किंमतीत तफावत असू शकते)
- मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
- अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
- अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद 107.75 पेट्रोल आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
- जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
- परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
- सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
- ठाणे पेट्रोलचा दर 106.63 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर
दरात कपात केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.
कमाईचा डोंगर
- केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांतील कमाईचे आकडे सादर केले
- केंद्र आणि राज्य सरकार दोघांना इंधनाच्या करातून जोरदार फायदा झाला
- 2022-23 च्या 9 महिन्यांत 5,45,002 कोटी रुपयांची कमाई पेट्रोलियम उत्पादनातून झाली
- आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 7,74,425 कोटी, 2019-20 मध्ये 5,55,370 कोटी रुपये
- आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 5,75,632 कोटी, 2017-18 मध्ये 5,43,026 कोटी रुपये फायदा झाला