Petrol-Diesel Price : बजेटपूर्वी पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त? आजचा भाव घ्या जाणून

Petrol-Diesel Price : बजेटच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलचे भाव उतरणार का?

Petrol-Diesel Price : बजेटपूर्वी पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त? आजचा भाव घ्या जाणून
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 8:38 AM

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. 1 फेब्रुवारी, 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) मोदी सरकार-2 चे शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर या बजेटला महत्व प्राप्त झाले आहे. बजेटपूर्वी 31 जानेवारी रोजी भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) जाहीर केले आहे. देशात आज भावात मोठी तफावत दिसली नाही. सोमवारी असलेला भावच देशभरात कायम आहे. देशातील चार मोठ्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसली नाही.

भारतात प्रत्येक दिवशी तेल विपणन कंपन्या कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या भावानुसार ठरवितात. आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलच्या किंमतीत (WTI Crude Oil Price) आज एकूण 0.09 टक्क्यांची वाढ झाली. आज भाव 77.97 डॉलर प्रति बॅरल होते. तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude) किंमतीत 2.03 टक्क्यांची घसरण झाली. किंमती 84.90 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.61 तर डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.70 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.12 तर डिझेल 94.60 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 106.46 आणि डिझेल 92.98 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 93.59 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.26 आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.86 रुपये तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.