Crude Oil : क्रूड ऑईल सूसाट, दोनच दिवसात मोठी उसळी, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय

Crude Oil : क्रूड ऑईलचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर भडकले आहेत, त्याचा काय परिणाम होणार..

Crude Oil : क्रूड ऑईल सूसाट, दोनच दिवसात मोठी उसळी, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय
आजचे दर काय
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पाताळीवर क्रूड ऑईलचे भाव (Crude Oil Price) भडकले. सलग तिसऱ्या दिवशी भावात वाढ झाली. गेल्या आठवड्यात कच्चा तेलाचा भाव 100 डॉलर प्रति बॅरलवर गेला होता. त्यानंतर भावात पडझड झाली. आता 80 डॉलर प्रति बॅरलवरुन कच्चे तेल 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. रोजच्या बदलत्या किंमतीनुसार तेल विपणन कंपन्यांना (Oil Marketing Companies) कच्चे तेल खरेदी करावे लागते. महाग दराचे कच्चे तेल खरेदीचा देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर (Petrol-Diesel Price Today) काय परिणाम होईल ते लवकरच दिसून येईल. बजेटपूर्वी भावात दरवाढ करण्यात येते का? अर्थसंकल्पात कर कपातीचा दिलासा मिळू शकता हे नागरिकांना लवकरच समजेल.

आज सकाळी तेल विपणन कंपन्यांनी भाव जाहीर केले. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आजही वाढलेल्या नाहीत. भावात कंपन्यांनी कोणतीही वाढ केलेली नाही. करानुसार प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रदेशात भावात तफावत दिसून येते.

कच्चा तेलाच्या भावाने आज जोरदार उसळी घेतली. ब्रेंट क्रूडचा भाव आज 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. ब्रेंट क्रूडच्या दरात 1.71 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. ब्रेंट क्रूड 87.63 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या किंमतीत 1.22 टक्क्यांची वृद्धी झाली. हा तेल 81.31 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोलचा भाव 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे.

अहमदनगरमध्ये पेट्रोल 106.53 रुपये, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये, अमरावतीत 107.23, औरंगाबाद 106.69, नागपूरमध्ये 106.04, नांदेडमध्ये 108.32, जळगावमध्ये 106.89, नाशिकमध्ये 105.89 रुपये, लातूरमध्ये 107.19, कोल्हापूरमध्ये 106.47, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.19, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.18 रुपये प्रति लिटर आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे (How to check diesel petrol price daily through SMS) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....