Petrol Diesel Rate : अरे देवाला तरी घाबरा! पाकिस्तानी जनतेचा टाहो, पेट्रोल-डिझेलचा फुटला बॉम्ब

Petrol Diesel Rate : पाकिस्तानमध्ये महागाईचा बॉम्ब फुटला. काळजीवाहू सरकारने पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे जनतेला आता त्राहिमाम त्राहिमाम करावे लागत आहे

Petrol Diesel Rate : अरे देवाला तरी घाबरा! पाकिस्तानी जनतेचा टाहो, पेट्रोल-डिझेलचा फुटला बॉम्ब
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 2:57 PM

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : भारताचा शेजारी पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर आहे. हा देश कंगाल होण्याच्या काठावर आहे. जगभरातून मदतीसाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पाकिस्तानला अजून यश आले नाही. पाकिस्तानला वाऱ्यावर सोडत पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सत्ता सोडली. त्यानंतर आता काळजीवाहू सरकारच्या हातात सर्व कारभार आहे. या सरकारने आल्या आल्याच इंधन दरवाढ केली होती. जनता महागाईने मेटाकुटीला आलेली असतानाच आता पुन्हा डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीचा (Petrol Diesel Rates in Pakistan) बॉम्ब फोडण्यात आला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर होणार आहे. अगोदरच पाकिस्तानमध्ये प्रत्येक वस्तू महागडी झाली आहे. या निर्णयामुळे मालवाहतूक महागेल आणि जनता महागाईच्या मगरमिठ्ठीत अडकणार आहे.

इतकी झाली दरवाढ

पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोल 26. 2 रुपये तर डिझेलमध्ये 17.34 रुपयांची वाढ केली आहे. पाकिस्तानचे यापूर्वीचे शहबाज सरकार थापडे निघाले. त्यांना कुठूनच मदत मिळवता आली नाही. प्रत्येक ठिकाणी नाक ठेचल्याने शहबाज यांनी अजून नाचक्की नको म्हणून मुदतपूर्व राजीनामा दिला. आता काळजीवाहू सरकारने जनतेची काळजी दूर करण्याऐवजी, त्यांचीच काळजी वाढवली आहे.

हे सुद्धा वाचा

आता काय आहे नवीन भाव

गेल्या आठवड्यात आर्थिक सहकार्य समितीने (ECC) पेट्रोलियम डीलर्स आणि तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील नफ्यात 3.5 रुपये प्रति लिटर वाढीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंधन दरामध्ये वाढ झाली आहे. नवीन किंमतींनुसार पेट्रोल आता 331.38 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर तर डिझेल 329.18 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाले आहे.

यापूर्वी दरवाढ

याच महिन्याच्या सुरुवातीला काळजीवाहू सरकारने पेट्रोलच्या किंमतीत 14.91 रुपये आणि डिझेलच्या किंमतीत 18.44 रुपये प्रति लिटरची वाढ केली होती. त्यापूर्वी शहबाज शरिफ सरकारने पेट्रोलच्या किंमतीत 19.95 पाकिस्तानी रुपया आणि डिझेलच्या किंमतीत 19.90 पाकिस्तानी रुपयाची वाढ केली होती.

पाकिस्तानी रुपयाचे अधःपतन

पाकिस्तानी रुपयाची स्थिती अत्यंत वाईट आहे. भारतीय रुपयापेक्षा पण पाकिस्तानी रुपयात अधिक घसरण आहे. रुपयाच्या किंमतीत काही दिवसात मोठी घसरण झाली आहे. सध्या एका भारतीय रुपयाची किंमत पाकिस्तानच्या 3.70 रुपया बरोबर आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीच मान टाकली आहे. मोदी सरकारच्या काळात रुपयात मोठी घसरण झाली. त्यापूर्वी युपीएच्या काळात पण रुपया घसरला होता. अजूनही डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सावरलेला नाही. पाकिस्तानी रुपयाची तर भारतीय रुपयापेक्षा पण परिस्थिती बिकट आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.