Petrol Diesel Rate Today : या राज्यात डिझेल 3 रुपयांनी महाग, पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : या राज्यात डिझेलचा भाव 3 रुपयांनी वधारला आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. त्यातच या राज्याने अधिभार वाढवला आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल महागले का? आजचा किती आहे भाव

Petrol Diesel Rate Today : या राज्यात डिझेल 3 रुपयांनी महाग, पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 8:38 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil) मोठी उसळी घेतली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या किंमती कमी आहेत. पण ब्रेंट क्रूड ऑईल आणि डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलने बाजारात धोक्याची घंटा वाजवली आहे. या वर्षी जानेवारीत किंमती 80 डॉलर प्रति बॅरलवर झाले होते. त्यानंतर कच्चा तेलात मोठी घसरण झाली होती. त्याचा फायदा कंपन्यांना झाला. आता तीन दिवसांत कच्चा तेलाने आगेकूच केली. किंमती 80 डॉलरच्या पुढे सरकल्या नाहीत. पण या किंमतींनी पुढचा टप्पा गाठला तर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारतात या राज्यात रात्रीतूनच डिझेलचा भाव 3 रुपयांनी वधारला. या राज्याने अधिभार वाढवला आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) महागले का? आजचा किती आहे भाव..

आस्मानी, सुलतानी संकट हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. संपूर्ण राज्य जलमय झाले आहे. पर्यटन स्थळांना मोठा फटका बसला आहे. हे संकट कमी म्हणून की काय, हिमाचल प्रदेश सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धीत करात 3 रुपयांची दरवाढ केली आहे. यापूर्वी सुद्धा डिझेल तीन रुपयांनी महागले होते. आता डिझेलवर 10 रुपये 40 पैशांचा वॅट लागेल. पूर्वी वॅट 7 रुपये 40 पैसे होता.

कंपन्या मालामाल भारतीय तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून फायद्यात आहेत. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

भाव केले अपडेट जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. आता कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर केल्या. सकाळी 6 वाजता इंधनाचे भाव अपडेट करण्यात आले.

कच्चे तेल गगनाला  जागतिक बाजारात कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली. 15 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 79.87 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 75.42 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहचले आहेत.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.