Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात पडझड, कधी होणार पेट्रोल-डिझेल स्वस्त, आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात पडझड सुरुच आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्या भाव कमी करण्याचा मुद्या एकमेकांकडे टोलावत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हीच युक्ती कामी येत आहे. विरोधकांना या मुद्यावर आक्रमक होता आलेले नाही. काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव, एक क्लिकवर जाणून घ्या..

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात पडझड, कधी होणार पेट्रोल-डिझेल स्वस्त, आजचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात पडझड सुरुच आहे. रशियातील नव्या बंडाळीमुळे युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत लवकरच निर्णायकी लढाई होऊ शकते. बंडाची धग कायम असल्याने बाजारावर दबाव आला आहे. तेल कंपन्या यातूनही फायद्याचे गणित जुळवून आणत आहे. त्यांना रशियाकडून स्वस्तात इंधन (Crude Oil Price) मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करुन युरोपियन देशातील विक्रीतून कंपन्या मालामाल झाल्या आहेत. देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईचा मुद्या समोर आला तर, कंपन्या आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. विरोधकांना या मुद्यावर आक्रमक होता आलेले नाही. काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price), एक क्लिकवर जाणून घ्या..

कच्चे तेल झाले स्वस्त पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईल गगनाला भिडले होते. किंमती प्रति बॅरल 140 डॉलर झाल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चे तेल दणकावून आपटले आहे. किंमती तेव्हापासून 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

आजचा भाव काय जागतिक बाजारात कच्चे तेल घसरणीवरच आहे. 28 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 72.46 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 67.87 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमती घसरणीवर आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.17 आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.79 तर डिझेल 95.21 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.80 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  • भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  • देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  • त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  • पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  • इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  • बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  • त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  • एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.