Petrol Diesel Rate Today : या ठिकाणी तर वाढले भाव, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत काय

Petrol Diesel Rate Today : राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे. तर या ठिकाणी इंधनाचा दर कमी आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय नागरिकांना वाढीव दरानेच इंधन खरेदी करावे लागत असले तरी स्थानिक कर आणि इतर शुल्कामुळे भावात तफावत दिसून येते.

Petrol Diesel Rate Today : या ठिकाणी तर वाढले भाव, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकार गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत सातत्याने राँग नंबर डायल करायला लावत आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव आपटले आहेत. रशियाकडून स्वस्तात क्रूड ऑईल (Crude Oil Price) खरेदी सुरु आहे. तेल कंपन्या युरोपियन राष्ट्रांमध्ये त्याची विक्री करुन नफा कमावत आहे. पण भारतीय नागरिकांना गेल्या वर्षभरापासून चढ्या दरानेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. स्थानिक कर आणि इतर शुल्कामुळे भावात तफावत दिसून येते. राज्यातील अनेक शहरात आज पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) महागले आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर तुम्हाला जाणून घेता येईल.

कच्चे तेल घसरले मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईल महागले होते. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चे तेल दणकावून आपटले आहे. किंमती तेव्हापासून 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत.

आज हा भाव जागतिक बाजारात कच्चे तेल घसरणीवरच आहे. 27 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.15 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 69.38 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमती घसरणीवर आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.35 तर डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.07 पेट्रोल आणि डिझेल 93.55 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.01 आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.99 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  • भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  • देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  • त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  • पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  • इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  • बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  • त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  • एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.