Petrol Diesel Price : होळीत महागाईचे दहण! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, करांमध्ये लवकरच मोठी कपात

Petrol Diesel Price : एकीकडे रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा होत असताना आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीचे संकेत दिले आहे. त्यामुळे यंदाच्या होळीत महागाईचे दहण झाल्याची चर्चा रंगली आहे. खरंच तुम्हाला पेट्रोल-डिझेल स्वस्तात मिळेल का?

Petrol Diesel Price : होळीत महागाईचे दहण! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, करांमध्ये लवकरच मोठी कपात
स्वस्ताईची उधळण
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 8:40 AM

नवी दिल्ली : आंतररराष्ट्रीय बाजारात रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाचा (Crude Oil Price) पुरवठा होत असताना आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात (Petrol Diesel Price) कपातीचे संकेत दिले आहे. त्यामुळे यंदाच्या होळीत महागाईचे दहण झाल्याची चर्चा रंगली आहे. रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल, संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची आयात केली होती. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.कच्चे तेल भारतीय तेल विपणन कंपन्या खरेदी केल्यानंतर शुद्धीकरण प्रकल्पात (Refineries) त्यातून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती करण्यात येते. आंतरराष्ट्रीय भावानुसार दररोज देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर परिणाम होतो. तुमच्या शहरातील किंमती तुम्हाला घरबसल्या एका एसएमएसवर जाणून घेता येतात. तसेच इतर शहरातील भावही जाणून घेता येतात. सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यात फार मोठा बदल झालेला नाही.

डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) मध्ये 0.01 टक्क्यांची वाढ होऊन 80.47 डॉलर प्रति बॅरल विक्री होत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 0.41 टक्के वाढ झाल्याने एक बॅरलचा भाव 86.18 डॉलर झाला. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचे संकेत दिले आहे. त्यामुळे काल झालेल्या होळीत महागाईचे दहण झाल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात हा दिलासा कधी मिळणार हे मात्र केंद्र सरकारने ठामपणे सांगितले नाही.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.