Petrol price: पेट्रोलच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, डिझेलही महागले
इंधनाच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 115. 83 व डिझेल 106.59 रुपयांवर पोहोचले आहे.
नवी दिल्ली – इंधनाच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 115. 83 व डिझेल 106.59 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील इंधनाच्या किमती वाढल्या असून, एक लीटर पेट्रोलसाठी 110.08 रुपये तर एका लिटर डिझेलसाठी 98.44 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल 150 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल 85 डॉलरच्या आसपास असून, ते येत्या काळात 100 डॉलरवर गेल्यास पेट्रोलची किंमत प्रति लिटर 150 च्या आसपास पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यामध्ये तब्बल 24 वेळा इंधनाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने, सर्वच उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढली असून, दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.
ओपेक देशांची बैठक
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. ओपेक या संघटनेत इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. 1960 साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर या संघटनेचे नियंत्रण आहे. त्यामुळे या संघटनेने आगामी बैठकीत तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास खनिज तेलाचे दर कमी होतील.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वीच मोठी बातमी! सोने स्वस्त; तोळ्याचा भाव काय?#Dhanteras #Dhanteras2021 #GoldSilverPriceToday #GoldSilverRateToday https://t.co/cMTNauRCwd
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021
सबंधित बातम्या
आयकर विभागाने नवीन पोर्टलवर जारी केले AIS, करदात्यांना मिळेल फायदा!