Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे भाव जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (petrol, diesel rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 37 दिवसांपासून पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर स्थिर आहेत. एकीकडे आंतरराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात गेल्या दीड महिन्यापासून चढउतार पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या दरात चढउतार असून देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. या काळात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर दहा रुपयांपेक्षाही अधिक महाग झाले. मात्र सहा एप्रिलपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये आहे. एकीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे इतर इंधनामध्ये मोठी दरवाढ दिसून येत आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 रुपये असून, डिझेलचा दर 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे. उपराजधानी नागूपरमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.40 आणि 103.73 रुपये लिटर आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 106 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये तर डिझेलचा किंमत प्रति लिटर 104. 50 रुपये आहे.
इतर इंधनामध्ये दरवाढ
राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे इतर इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सीएनजी, पीएनजी गॅसचे दर वाढवण्यात आले आहेत. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आठवडाभरात घरगुती सिलिंडरच्या दरात देखील 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जेट फ्यूल देखील महाग झाले आहे. इंधनाचे दर वाढत असल्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे.