पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, सलग 9 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, सलग 9 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 6:35 AM

Petrol Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. बुधवारी देखील सीएनजीमध्ये प्रति किलो मागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती, तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, दर स्थिर आहेत. 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली होती. सहा एप्रिलपर्यंत इंधनाच्या किमती जवळपास प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढवण्यात आल्या, मात्र आता इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आजच्या दराप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल,डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. पेट्रोलयिम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. जाणून घेऊयात राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

शहर    पेट्रोल            डिझेल

मुंबई  120.51          104.77

नागपूर 120.15        102.89

औरंगाबाद 121.76   104.40

कोल्हापूर 120.11    102.82

पुणे    120.30         104. 30

इंधनाचे दर कच्च्या तेलावर अवलंबून

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. गेल्या काही दिवसांमध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या दरांवर झाला आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा मोठा निर्यातदार देश आहे. मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, ते 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत होती. मात्र गेल्या 9 दिवसांपासून इंधन दरवाढीला ब्रेक लागला असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

संबंधित बातम्या

विमाधारकांसाठी महत्वाची बातमी… ‘क्लेम सेटलमेंट’मधील कटकट होणार कमी, वाचा सविस्तर

Vehicles Prices Increases : का होत आहेत चारचाकी वाहने महाग? चारचाकी घ्यायचे आहे? त्याआधी हे वाचा

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी 17500 वर बंद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.