Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
इंधन (Fuel) दरवाढीसंदर्भात दिलासादायक बामती समोर येत आहे. 22 मार्चपासून सातत्याने पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये वाढ होत होती. दहा दिवसांमध्ये तब्बल नऊ वेळा भाव वाढवण्यात आले होते. मात्र आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून भाव स्थिर आहेत.
Petrol, Diesel Price : इंधन (Fuel) दरवाढीसंदर्भात दिलासादायक बामती समोर येत आहे. 22 मार्चपासून सातत्याने पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये वाढ होत होती. दहा दिवसांमध्ये तब्बल नऊ वेळा भाव वाढवण्यात आले होते. मात्र आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून भाव स्थिर आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.81 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 93.07 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपये आहे. तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6. 84 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र आज इंधनाच्या दरात कुठलीही वाढ झाली नसल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर
देशातील प्रमुख पेट्रोलिय कंपन्यांकडून शुक्रवारी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले. नव्या दरानुसार देशात आज इंधनाचे दर स्थिर आहेत. राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 116.72 रुपये तर डिझेल 100.94 रुपये आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 116.53 आणि डिझेल 99.23 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 115.71 तर डिझेल 98.47 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 115.37 आणि 98.12 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 115.80 रुपये लिटर आणि डिझेल 98.37 रुपये लिटर इतके आहे.
या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा अधिक महाग
गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये नऊवेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या दहा दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल 6.84 रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत. आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या
सौदी अरेबिया कच्च्या तेलाचे दर वाढवणार; सर्वाधिक फटका आशियाई देशांना बसणार
1 एप्रिलला हलक्यात घेऊ नका! 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची दाट शक्यता, काय काय महागणार?