AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : ठाणेकरांना लॉटरी! राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, भाव एका क्लिकवर

Petrol Diesel Price Today : शनिवार-रविवारसह सोमवारी 1 मेची सुट्टी असल्याने अनेक जण आता सुट्टी घालविण्यासाठी घराबाहेर पडतील. त्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव एका क्लिकवर

Petrol Diesel Price Today : ठाणेकरांना लॉटरी! राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, भाव एका क्लिकवर
कुठे स्वस्त तर कुठे महाग
| Updated on: Apr 29, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली : शनिवार-रविवारसह सोमवारी 1 मेची सुट्टी आली आहे. मुलांच्या शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जणांनी कुटुंबासोबत सुट्टी घालविण्याचा प्लॅन आखला आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील इंधनाचा भाव (Petrol Diesel Price) जाणून घ्या. आज राज्यात ठाणेकरांना सर्वात स्वस्त इंधन मिळत आहे. ठाण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 105.77 रुपये तर एक लिटर डिझेल 92.27 रुपये आहे. परभणीचा रेकॉर्ड मोडत नांदेडने इंधन दरवाढीत आघाडी घेतली आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोल 108.21 रुपये तर एक लिटर डिझेलचा भाव 94.69 रुपये आहे. तुमच्या शहरातील इंधनाचा दर आता एका एसएमएसच्या मदतीने तुम्हाला माहिती करुन घेता येईल.

कच्चा तेलाचा भाव काय आज 29 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत दरवाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 2 डॉलरने वाढून 76.78 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) वधारुन 79.54 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.52 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.34 पेट्रोल आणि डिझेल 93.82 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.18 आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.07 तर डिझेल 92.62 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.49 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.61 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.