Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? अग्निवीरांची 4 वर्षानंतरचीही सोय झाली? प्लास्टिक इंजस्ट्रीजकडून रेड कार्पेट! लाखभर ऑफर लेटर तयार ठेवणार!

अग्निपथ योजनेला विरोध होत असला तर उद्योग जगताने अग्निवीरांना चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे जाहीर केलं आहे. मोठ्या कॉर्पोरेट समुह आणि दिग्गज उद्योगपतीनंतर आता प्लास्टिक इंडस्ट्रीने पण अग्निवीरांना नोकरी देण्याचा कबूल केले आहे.

काय सांगता? अग्निवीरांची 4 वर्षानंतरचीही सोय झाली? प्लास्टिक इंजस्ट्रीजकडून रेड कार्पेट! लाखभर ऑफर लेटर तयार ठेवणार!
अग्निवीरांसाठी प्लास्टीक इंडस्ट्री सरसावलीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 6:24 PM

आजपासून सैन्य दलात नव्याने सुरु झालेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. देशाच्या काही भागात तर याविरोधात हिंसक प्रदर्शने झालीत. सरकारी संपत्तीचे आतोनात नुकसान झाले. रेल्वे बोर्डालाच (Railway Board) जवळपास 700 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. चार वर्षांच्या सेवेच्या अटीमुळे तरुणांचा या योजनेला विरोध आहे. चार वर्षानंतर खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले युवक बेरोजगार होतील अशी टिकाकारांची भूमिका आहे. अशाही परिस्थितीत अनेक उद्योजकांनी (Industrialists) आणि मोठ्या कॉर्पोरेट समुहांनी (Corporate Houses)अग्निवीरांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत. त्यांना चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. आता प्लास्टिक इंडस्ट्रीने (Plastic Industries)अग्निवीरांसाठी पुढाकार घेतला असून अग्निवीरांसाठी लाखभर नोक-या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधापेक्षा या योजनेला अनुकूल वातावरण तयार होताना दिसत आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालयाने ही अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केलं आहे. त्यामुळे अग्निवीरांना चार वर्षानंतर अनेक संधी चालून आल्या आहेत.

प्लास्टिक संघटनेने केली घोषणा

प्लास्टिक इंडस्ट्रीची उच्च संस्था प्लास्टइंडिया फाऊंडेशनने(PlstIndia Foundation) बुधवारी अग्निवीरांना नोकरी देण्याविषयीची घोषणा केली. चार वर्षे अग्निपथ योजनेतंर्गत प्रशिक्षण घेतलेल्या एक लाख अग्निवीरांना एकटी प्लास्टिक इंडस्ट्री नोकरी देऊ शकते, असे घोषीत केले आहे. संघटनने अग्निपथ योजनेला समर्थन दिले आहे. सध्या प्लास्टिक उद्योगात 50 हजारांहून अधिक प्रोसेसिंग युनिट कार्यरत आहेत. गेल्या तीन दशकात प्लास्टिकच्या उत्पादनात आणि वापरात कितीतरी पटीने वाढ झाली आहे. परिणामी प्लास्टिक इंडस्ट्री भरधाव पुढे जात आहे. इंडस्ट्रीत तरुण आणि कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे एक लाख अग्निवीरांना नोकरी देण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे प्लास्ट इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष जिगीश जोशी यांनी सांगितले. देशाची प्लास्टिक इंडस्ट्री यापूर्वीच 40 लाखांहून अधिक लोकांना नोकरी दिल्याचा सांगत या उद्योगामुळे अप्रत्यक्षरित्या 4 कोटी जणांना अप्रत्यक्षरित्या फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अग्निवीरांना यापूर्वी नोकरी देण्याचे यांनी दिले आश्वासन

यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज(Reliance Industries), टाटा समुह(Tata Group), महिंद्रा समुह(Mahindra Group), आरपीजी एंटरप्राईजेज (RPG Enterprises), बायोकॉन(Biocon),अपोल हॉस्पिटल ग्रुप(Apollo Hospital Group) या सारखे कॉर्पोरेट समुहांनी अग्निपथ योजनेला समर्थनच दिले नाहीतर त्यांच्या समुहात अग्निवीरांना नोकरी देण्याचे आश्वासन ही दिले आहे. यासोबतच इतर अनेक उद्योजकांनी आणि दिग्गजांनी ही या योजनेला आणि सरकारच्या धोरणाला त्यांचा पांठिबा दर्शवला आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.