Multibagger Stock: प्लास्टिक पाईप कंपनीची कमाल; 10 वर्षांत एक लाखांचे झाले 63 लाख

दीर्घकालीन गुंतवणुकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉकने जोरदार कामगिरी बजावली आहे. सध्याच्या नकारात्मक परिस्थितीत ही काही शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. प्लास्टिक पाईप कंपनी एस्ट्रल लिमिटेडच्या शेअरने गुंतवणुकदारांचे नशीब चमकावले आहे.

Multibagger Stock: प्लास्टिक पाईप कंपनीची कमाल; 10 वर्षांत एक लाखांचे झाले 63 लाख
एस्ट्रल शेअरचा जोरदार परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 7:00 PM

शेअर बाजारात(Share Market) गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा छळवाद सुरु आहे. गुंतवणुकदार बेहाल आहेत. कुठे गुंतवणूक (Investors) केल्यास फायदा होईल या विवंचनेत गुंतवणुकदार आहेत. अशा दोलनमय परिस्थितीत ही काही शेअर मात्र किल्ला लढवत आहेत. सध्या प्रत्येक गुंतवणुकदार पोर्टफोलियातील (Portfolio) नुकसानीची चर्चा करत आहे. खासकरुन शॉट टर्म (Short term) आणि मल्टीबॅगर (Multibagger) परताव्याची अपेक्षा ठेवणारे गुंतवणुकदार प्रचंड निराश झाले आहेत. परंतू दीर्घकालीन गुंतवणुकदारांच्या पोर्टफोलिओत बाजाराचे तगडे उमेदवार आहेत. त्यांना बाजारातील या घडामोडींचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. त्यांच्या भात्यात अॅस्ट्रल लिमिटेड (Astral limited) या प्लास्टिक पाईपचा शेअर आहे आणि या शेअरने गुंतवणुकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या कंपनीने गेल्या दहा वर्षांत गुंतवणुकदारांचे एक लाख रुपयांचे तब्बल 63 लाख रुपये परतावा (Return) दिला आहे.

दीर्घकालीन मुदतीत गुंतवणुकदार मालामाल

एस्ट्रल लिमिटेडचा शेअर आज बुधवारी दुपारी व्यापारी सत्रात बीएसईवर 1.34 टक्क्यांच्या फायद्यासह 1,656 रुपयांच्या वर ट्रेंड करत होता. यावर्षी विक्रीच्या सपाटयात या शेअरचा भाव 30 टक्के घसरला. नाहीतर या शेअरचा भाव 2,500 रुपयांच्यावर होता. सध्या हा शेअर त्याच्या 52 आठवडयांच्या सर्वात कमी 1,601.55 रुपयांच्या जवळपास आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा आधारे बघितल्यास गेल्या 10 वर्षांत हा शेअर रॉकेटच्या गतीने वर आला आहे. या गुंतवणुकीवर सध्याच्या पडझडीचा परिणाम दिसत असला तरी एकूण परताव्यात हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

हे सुद्धा वाचा

10 वर्षांत 6000 टक्के जास्त चढा भाव

आजपासून 10 वर्षांपूर्वी एस्ट्रल लिमिटेड च्या शेअरचा भाव फक्त 25.75 रुपये होते. सध्या हा भाव 1,656 रुपयांच्या वर आहे. याचा अर्थ दहा वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणुकदारांना 6000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणुकदाराने दहा वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाखांची गुंतवणूक केली असती आणि ती होल्ड केली असती तर या गुंतवणुकीचे मूल्य आज 63 लाख रुपये झाले असते.

पाच वर्षांत गुंतवणुकदार मालामाल

गेल्या एका वर्षात हा शेअर घसरणीचा शिकार झाला आहे. गेल्या महिन्यात हा शेअर 1,712 रुपयांच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत यामध्ये जवळपास 28 टक्क्यांची आणि गेल्या एका वर्षात जवळपास 16 टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतू दीर्घकालीन गुंतवणुकीचा हिशेब बघता ही गणितं कुचकामी ठरतात. 10 वर्षांचे गणित सोडा, केवळ 5 वर्षांचे गणित बघितल्यास या शेअरने जवळपास 290 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हे गणित कम्माऊंडिंगआधारे मांडल्यास एका वर्षाला जवळपास (CAGR)32 टक्के व्याजाबरोबरचा हा परतावा आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.