Sula Vineyards : सुलाच्या चाहत्यांना सुखद धक्का, कमाईची चालून आली संधी, लवकरच येणार IPO, आता म्हणा ‘चिअर्स!’
Sula Vineyards : सुलाच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे..
नवी दिल्ली : Sula हे नाव मद्याच्या चहात्यांना माहिती नाही, असे होणार नाही. नाशिकमधील सुलाने जागतिक ब्रँड म्हणून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ही कंपनी शेअर बाजारात नशीब आजमावणार आहे. सुला वाईनयार्ड्स आयपीओ (Sula Vineyards IPO) लवकरच बाजारात येणार आहे. या इश्यूचा साईज (Issue Size) 960.35 कोटी रुपयांचा असेल. हा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात दाखल होत आहे. हा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल (Offer For Sale) राहणार आहे.
वाईन तयार करणारी (Wine Maker) कंपनी सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ 12 डिसेंबर रोजी बाजारात दाखल होऊ शकतो. कंपनी जुलै 2022 मध्ये बाजार नियंत्रक सेबीकडे (SEBI) मसुदा ऑफर माहितीपत्रक (DRHP) जमा केले होते.
कंपनीने बाजारात पाय ठेवण्यापूर्वी इश्यू साईज 1200-1400 कोटी रुपयांनी कमी केला आहे. या इश्युचा आकार आता 960.35 कोटी रुपये असणार आहे. कंपनीने आयपीओसाठी शेअर प्राईस बँड तयार केला आहे. हा बँड 340-357 रुपये प्रति शेअर असेल. माहितीनुसार 42 शेअरचा साईज लॉट असेल.
ही कंपनी हा इश्यू पूर्णतः ऑफर फॉर सेल आसणार आहे. कंपनीचे शेअर विक्रीसाठी ही पद्धत प्रचलित आहे. यामध्ये कंपनीचे प्रमोटर त्यांच्याकडील शेअर होल्डिंग पारदर्शकपणे कमी करतील. शेअर बाजारात सुचीबद्ध होणारी सुला ही देशातील पहिली वाईन उत्पादन कंपनी आहे.
Sula Vineyards ने आयपीओच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या शेअर्सच्या प्राईस ब्रँडची माहिती दिलेली नाही. परंतु, इश्यू बाजारात दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा आयपीओ बाजारात 12 डिसेंबर रोजी नोंदणीसाठी खुला होईल.
14 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करु शकतील. एंकर गुंतवणूकदारांसाठी हा इश्यू 9 डिसेंबर रोजी खुला होईल. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात या कंपनीत गुंतवणुकीची संधी उपलब्ध होत आहे.
या वाईन निर्मिती कंपनीची स्थापना 1996 साली करण्यात आली होती. रासा, दिंडोरी, द सोर्स, सटोरी, मदेरा आणि दीया सह या कंपनीचे 13 ब्रँड असून त्यातंर्गत 56 प्रकारच्या वाईनची निर्मिती करण्यात येते. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या कंपनीला 52.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.