AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Samman Nidhi चे 2000 ‘या दिवशी’ शेतकऱ्यांच्या खात्यावर, असा तपासा तुमचा बॅलन्स

पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 2000 रु. शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 डिसेंबरपासून वर्ग होणार आहेत.PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi चे 2000 'या दिवशी' शेतकऱ्यांच्या खात्यावर, असा तपासा तुमचा बॅलन्स
या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार नाहीत 2 हजार रुपये
| Updated on: Dec 20, 2020 | 10:58 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील'(PM-Kisan Samman Nidhi Scheme) 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 डिसेंबर पासून वर्ग करणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 11.17 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती. (PM Kisan Samman Nidhi Scheme 7th Installment amount transfer from 25th December 2020)

शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार जमा

पंतप्रधान किसान सन्मान निधी  (PM Kisan Samman Nidhi) या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत शेतक-यांना सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत जमा केली आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांसी लिंक असणं आवश्यक आहे.

सातव्या हप्त्याचा लाभ 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकर्‍यांना मिळणार आहे. मात्र, त्यांची कागदपत्रे बरोबर असणं आवश्यक आहे. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. काही शेतकर्‍यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत, कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधारकार्डची माहिती उपलब्ध नाही. तर काहींच्या नावामध्ये गडबड असल्यानं पैसेदेखील थांबवण्यात आलेले आहेत.

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?

पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….

  • सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सम्मान निधीचं होमपेज दिसेल.
  • होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
  • तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाउंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
  • त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

संबंधित बातम्या:

किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता जारी, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

PM Kisan Yojna : अद्याप 7.5 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले नाहीत, पैसे हवे असल्यास करा हे काम

(PM Kisan Samman Nidhi Scheme 7th Installment amount transfer from 25th December 2020)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.