AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi on HAL and LIC : HAL आणि LIC ने केले मालामाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उगीच नाही केले कौतुक

PM Modi on HAL and LIC : एलआयसी आणि हल संदर्भात विरोधकांनी संभ्रमाचे वातावरण केले. गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला असे उत्तर दिले. असा लेखाजोखा मांडला.

PM Modi on HAL and LIC : HAL आणि LIC ने केले मालामाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उगीच नाही केले कौतुक
| Updated on: Aug 10, 2023 | 7:34 PM
Share

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : देशातील सरकारी कंपन्या उद्धवस्त होत आहेत. केंद्र सरकार लंगड्या घोड्यांवर सट्टा लावत आहे. LIC मध्ये तुमचा पैसा डुबून जाईल. असे वातावरण विरोधकांनी तयार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. सरकारवरील अविश्वास ठरावाला उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. एचएएल (HAL) आणि एलआयसीविषयी (LIC) विरोधकांनी यापूर्वी पण केंद्र सरकारला कोडींत पकडले होते. आज पंतप्रधान मोदी यांनी या सर्व आरोपांचा समाचार घेतला. त्यांनी या दोन्ही कंपन्यांच्या कामगिरीची माहिती लोकसभेत दिली. तसेच गुंतवणूकदारांना त्यांनी मोलाचा सल्ला पण दिला.

विरोधकांचा आरोप काय

गेल्या काही वर्षांपासून एलआयसी आणि एचएएल-हल या दोन्ही कंपन्या केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाने उद्धवस्त केल्याचा आरोप करण्यात येत होता. पंतप्रधान मोदी संसदेत येत नाहीत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत नाही, असा आरोप विरोधक करत होते. या आरोपांना 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी जोरदार प्रतित्त्युर दिले. विरोधकांना या कंपन्यांच्या कामगिरीविषयी शंका असेल तर त्यांनी या कंपन्याचा डेटा तपासून आरोप करावा, असा पलटवार त्यांनी केला.

HAL ने केले मालामाल

आकड्यांचा हिशोब त्यांनी मांडला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने गेल्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले. या कंपनीचा चंद्रयान मिशनमध्ये मोठा वाटा आहे. एवढंच नाही तर या कंपनीने गुंतवणूकदारांचा पण मोठा फायदा करुन दिला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एचएएलचा शेअर 2446.90 रुपयांवर होता. आता हा शेअर 3824 रुपयांवर जवळपास आला आहे. या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा दिला.

LIC वर गुंतवणूकदारांना भरवसा

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आहे. त्यावर गेल्या वर्षापासून वादाचे ढग आहे. विरोधकांनी केंद्र सरकारच्या याविषयीच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. अदानी-हिंडनबर्ग रिपोर्टनंतर एलआयसीच्या गुंतवणूकीवर सवाल विचारण्यात आला. अदानी समूहात एलआयसीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अदानीसह ही कंपनी बुडेल, असा आरोप करण्यात आला होता. त्यावर एलआयसीतील पैसा सुरक्षित असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

किती दिला परतावा

इतक्या विवादानंतर ही एलआयसीच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. गेल्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांना जवळपास 6 टक्के रिटर्न मिळाला, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विरोधकांनी एलआयसी बुडण्याची भीती दाखवली, ती कंपनी मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही. विरोधकांच्या आरोपाला त्यांनी जोरदार उत्तर दिले.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.