मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेण्याचे बरेच फायदे आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 4 लाख रुपयांची आवश्यकता असेल. (PM Mudra scheme How To Start Soap manufacturing business)

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा
money
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:58 PM

मुंबई : सध्याच्या काळात साबण ही आवश्यक वस्तूंपैकी एक वस्तू समजली जाते. अंघोळीपासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व काम ही साबणाशिवाय शक्य होत नाही. साबण ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वापरतात. त्यामुळे साबणाची मागणी ही बाजारात कायम असते. याच संधीचे तुम्ही सोनं करु शकता. म्हणजेच तुम्ही लवकरच उत्पन्नासाठी साबण बनवण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. आज आम्ही तुम्हाला साबण तयार करण्याच्या युनिटबद्दलची माहिती देणार आहोत. (PM Mudra scheme How To Start Soap manufacturing business)

साबणाचा बिझनेस सुरु करण्यासाठी फार कमी गुंतवणूक करावी लागते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पंतप्रधान मोदी सरकारच्या मुद्रा योजनेतंर्गत 80 टक्के रक्कम कर्ज म्हणूनही मिळते. मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेण्याचे बरेच फायदे आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 4 लाख रुपयांची आवश्यकता असेल.

6 लाख रुपयांचा निव्वळ नफा

पंतप्रधान मुद्रा योजना प्रकल्पात या व्यवसायाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, साबण तयार करणारे युनिट बसवण्यासाठी तुम्हाला जवळपास 4 लाख रुपये खर्च करावे लागतील. साबणाचे उत्पादन सुरु झाल्यानंतर तुम्ही वर्षभरात 4 लाख किलोग्रॅम साबण तयार करू शकाल. म्हणजे मूल्यानुसार ही रक्कम जवळपास 47 लाख रुपये असेल. यात व्यवसायामधील सर्व खर्च आणि इतर खर्च वजा करता तुम्हाला 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा होईल. तर दरमहिना 50 हजार रुपये सहज कमावता येतील.

80 टक्क्यांपर्यंत कर्ज

सध्या काळात एखादा व्यवसाय सुरू करणे फार सोपे झाले आहे. सरकारकडूनच साबण कारखाना सुरु करण्याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल. या माहितीमध्ये व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारच्या खर्चासह इतर बाबींविषयी माहिती देण्यात आील आहे. तसेच जर तुमच्याकडे भांडवल नसेल तर मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला 80 टक्क्यांपर्यंत कर्ज सहज मिळू शकते. या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला प्रकल्प अहवाल तयार करण्याची देखील आवश्यकता नाही. हे कर्ज सरकार तुम्हाला स्वत: प्रदान करत आहे.

किती जागेची आवश्यकता?

साबण बनवण्याचे युनिट बसवण्यासाठी तुम्हाला एकूण 750 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. यातील 500 चौरस फूट व्यापलेले हवे. तर उर्वरित भाग हा खुला असावा. यात सर्व प्रकारच्या मशीनसह 8 प्रकारचे उपकरणं बसवण्यात येतील. या प्रकल्पाच्या अहवालानुसार या मशीन्स बसवण्याची एकूण किंमत फक्त 1 लाख रुपये इतकी आहे.

सुरुवातीचा खर्च किती?

साबण बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. यात तीन महिन्यांकरिता युनिट, यंत्रसामग्री, कार्यरत भांडवलाचा समावेश आहे. यातील 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला केवळ 3.82 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर उर्वरित रक्कम ही तुम्हाला मुद्रा योजनेंतर्गत मिळू शकते.

सरकार कशी करणार मदत?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे 4.23 लाख रुपये आहेत, हे दाखवावे लागेल. यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसाय सुरु करण्याचे ठिकाण, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि कर्जाची रक्कम इत्यादींची माहिती द्यावी लागेल. या योजनेंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क किंवा हमीची रक्कम देण्याची गरज भासत नाही. (PM Mudra scheme How To Start Soap manufacturing business)

संबंधित बातम्या : 

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, महाराष्ट्रात शंभरी पार, नवे दर काय?

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....