PMAYU : 50 हजार पगार, तरीही नाही मालकीचे घर, आता मदत करणार मोदी सरकार

Modi Government PMAYU : 6 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गींयांची सध्या मोठी अडचण झाली आहे. त्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. मुलांचे शिक्षण आणि इतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

PMAYU : 50 हजार पगार, तरीही नाही मालकीचे घर, आता मदत करणार मोदी सरकार
मोदी सरकारचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 3:34 PM

स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आताच्या महागाईच्या जमान्यात अनेकांसाठी घर घेणं हे स्वप्नच ठरत आहे. महागाईने मध्यमवर्गाचे कंबरडे मोडून काढले आहे. मुलांचे शिक्षण, आई-वडिलांच्या उपचार आणि इतर खर्चामुळे गृहकर्जाचे ओझे ते शिरावर घेऊ शकत नाहीत. या मध्यमवर्गाला मोदी सरकारने मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक योजना आणली आहे. बजेटमध्ये पण त्याची चर्चा झाली होती.

PMAY-U चा होणार फायदा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान निवास योजना-शहरी (PMAY-U) घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक वर्गासाठी घराचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच PMAY-U 2.0 ला मंजूरी दिली आहे. या योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS), कमी उत्पन्न गटातील आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) कुटुंबांसाठी घर खरेदी करणे अथवा तयार करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.

हे सुद्धा वाचा

योजनेत 3 लाख रुपयांची कमाई करणारा वर्ग ईडब्ल्यूएस प्रवर्गात आहे. तर 3 लाख ते 6 लाखांदरम्यान वार्षिक कमाई करणारे कुटुंब एलआयजी श्रेणीत आहेत. तर 6 ते 9 लाख वार्षिक कमाई करणारा वर्ग हा एमआयजी वर्गात आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

मध्यम वर्गाला पण केंद्राची मदत

6 ते 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमाई करणारा एमआयजी वर्ग आहे. या गटातील मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या मध्यमवर्गाची वार्षिक कमाई 6 लाख रुपये आहे, ते पण या श्रेणीत येतील. 50 हजार रुपये महिना कमाई करणारे या वर्गात मोडतात. त्यांना घर बांधण्यासाठी अथवा घर खरेदीसाठी मोदी सरकार मदत करणार आहेत.

काय आहे योजना

वर्ष 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-शहरी सुरू करण्यात आली. योजनेतंर्गत 1.18 कोटी घरांना मंजूरी देण्यात आली. या योजनेतंर्गत 85.5 लाखांहून अधिक घरांची निर्मिती करुन लाभार्थ्यांना ती देण्यात आली आहेत. इतर घरे तयार होत आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गासाठी घर योजना सुरु करण्याचे जाहीर केले होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.