धनादेश फसवणुकीला ‘पीएनबी’चा चाप ! ग्राहकांसाठी सुरु केली खास सुविधा

पंजाब नॅशनल बँकेने धनादेश फसवणुकीपासून ग्राहकांना वाचविण्यासाठी आणि कोर्टकचे-यांच्या कचाट्यात वेळ वाया जाऊ नये यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरु केली आहे. या सुविधेत ग्राहकांना त्यांच्या धनादेशाच्या प्राप्त परिस्थितीविषयी डिजिटल माहिती उपलब्ध होते.

धनादेश फसवणुकीला 'पीएनबी'चा चाप ! ग्राहकांसाठी सुरु केली खास सुविधा
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 11:46 AM

धनादेश अनादर आणि फसवणुकीची (Cheque Fraud and bounce) अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रकरणाच्या कचाट्यात अडकून बँका आणि ग्राहकांचा बहुतांश वेळ जातो. परक्राम्य संहिता अधिनियमाच्या (Negotiable instrument Act 1881) चे कलम 138 अंतर्गत याप्रकरणात न्यायालयात दाद मागण्यात येते. मात्र एकूणच ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे. पण असे प्रकार कमी करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. बँकेने अशी फसवणूक टाळण्यासाठी खास पद्धत सुरु केली आहे. पीएनबीने 10 लाखांपेश्रा अधिक रक्कमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) सुरु केली आहे. या पद्धतीनेच धनादेशाचा स्वीकार करण्यात येणार आहे. हा नियम 4 एप्रिल पासून लागू करण्यात आला आहे. 50 हजार रुपयांपेक्षा अधिक व्यवहाराचा धनादेश पीपीसी द्वारे पाठविण्यात येऊ शकतो. ही बाब संपूर्णता ग्राहकांवर अवलंबून आहे. त्यासाठी त्यावर बंधन घालण्यात आलेले नाही.

रिझर्व्ह बँकेची चेक ट्रांझेक्शन सिस्टिम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच चेक ट्रांझेक्शन सिस्टिम सुरु केली आहे. त्याच धरतीवर पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल टाकले आहे. धनादेशाद्वारे रक्कम सुरक्षित समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पोहचावी यासाठी बँकेने ही पद्धत अंगिकारली आहे. रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2021 रोजी सीटीएसचा नियम लागू केला होता. आता प्रत्येक बँक या सीटीएस प्रणालीचा अंगीकार करत आहेत. विशेष बाब म्हणजे सीटीएसमध्ये एकदा धनादशे अडकला आणि त्याने पॉझिटिव्ह पे सिस्टिमद्वारे तो पाठविला असेल तरच फसवणूक प्रकरणात अशा तक्रारींवर सुनावणी होईल. त्यामुळे ग्राहकांनी या पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.

धनादेश आणि खात्यासंबंधी माहिती

पॉझिटिव्ह पे सिस्टिमचा वापर करण्यासाठी ग्राहकांना काही महत्वाची माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही जमा करत असलेल्या धनादेश आणि खात्यासंबंधी असते. ग्राहक त्यांच्या धनादेशाची माहिती बँकेच्या शाखेत, डिजिटल माध्यमाने जसे की, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एसएमएस बँकिंग पद्धतीने देऊ शकतात. पीएनबीने त्यांच्या ग्राहकांना याविषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. ही माहिती आवश्यक यामध्ये खाते क्रमांक, धनादेश क्रमांक, धनादेश अल्फा, धनादेश रक्कम, बेनिफिशियरीचे नाव या माहितीचा समावेश होतो.

संबंधित बातम्या

CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

BSNL-MTNL: विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवर!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.