GST Slab Change : लवकरच जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदलाची शक्यता; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका, ‘अशी’ असेल नवी रचना

सध्याच्या जीएसटी स्लॅबमध्ये (GST slab) केंद्र सरकार (Central Government) काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात आहे. जीएसटी स्लॅबमधील बदलाला मंजुरी भेटल्यास यापुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर पाच टक्क्यांऐजी वाढीव कर (Tax) द्यावा लागण्याची शक्यता आहे.

GST Slab Change : लवकरच जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदलाची शक्यता; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका, 'अशी' असेल नवी रचना
निर्मला सितारमण, अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:26 PM

सध्याच्या जीएसटी स्लॅबमध्ये (GST slab) केंद्र सरकार (Central Government) काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात आहे. जीएसटी स्लॅबमधील बदलाला मंजुरी भेटल्यास यापुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर पाच टक्क्यांऐजी वाढीव कर (Tax) द्यावा लागण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेची बैठक पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पाच टक्के जीएसटीचा स्लॅब काढून टाकण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाच टक्क्यांचा स्लॅब हटवून त्यातील उच्च वापराच्या वस्तू या तीन टक्क्यांच्या स्लॅबमध्ये तर उर्वरित वस्तू या आठ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये टाकल्या जाणू शकता. असे केल्यास सरकारचे कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पादन वाढणार आहे. मात्र त्याचा मोठा फटका हा कर रुपाने सर्वसामान्यांना बसू शकतो. आधीच महागाई वाढली आहे. आता या महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

असा असेल नवा बदल

सध्या जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 असे चार स्लॅब आहेत. परंतु सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर तीन टक्के कर आकारला जातो. तर काही अशी देखील उत्पादने आहेत, ज्यांना जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र आता पाच टक्क्यांचा स्लॅब रद्द करून त्याऐवजी तीन टक्क्यांचा स्लॅबची निर्मिती करण्यात येणार आहे. मौल्यवान वस्तूंचा समावेश हा तीन टक्क्यांच्या जीएसटीमध्ये तर पाच टक्क्यातील उर्वरीत वस्तुंचा समावेश हा आठ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये करण्यात येणार आहे.

पुढील महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक

पुढील महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटी स्लॅबमध्ये बदलाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास काही वस्तू या महाग होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अतिरिक्त जीएसटी भारावा लागेल. आधीच महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आणखी महागाईची भर पडू शकते.

संबंधित बातम्या

जगभरात भाववाढीचा आगडोंब : भारतीयांच्या खिशावर भार, महागाईने अमेरिका-ब्रिटनसह उर्वरित देशही धास्तावले

दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती

Maruti Suzuki: SUV कार बाजारात पुन्हा दमदार एन्ट्रीसाठी मारुतीची टोयोटाला साद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.