पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्या

त्यामुळे तुम्ही कुठे गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे दुप्पट होतील, याची माहिती असणे गरजेचे आहे. (Post Office Vs Bank Which Is Better for Investment)

पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्या
EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:34 AM

मुंबई : गुंतवणूक केल्यानंतर पैसे झटपट दुप्पट व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. यासाठी अनेकजण पैसे गुंतवण्यासाठी बँक एफडीची मदत घेतात. एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने पैसे सुरक्षित राहतात. तसेच हे पैसे लवकर दुप्पट होतात, असा काहींना विश्वास असतो. तर काही जण हे पोस्ट ऑफिसमधील शेतकरी विकास पत्रात पैसे गुंतवतात. या ठिकाणी गुतंवणूक केल्यावर अधिक व्याज मिळतो, असे म्हटलं जाते. (Post Office Vs Bank Which Is Better for Investment)

जर तुम्हालाही पैसे गुंतवायचे असतील, तर तुमच्याही मनात ते नेमके कुठे गुंतवावे, कुठे ते सुरक्षित राहतील, कुठे गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील, असे अनेक प्रश्न तुम्हाला त्रास देतात. मात्र सद्यस्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे योग्य ठरते की बँक एफडीमध्ये याबद्दलचा गोंधळ दूर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे दुप्पट होतील, याची माहिती असणे गरजेचे आहे.

किसान विकास पत्रमध्ये काय खास?

किसान विकास पत्र हे सर्वाधिक व्याज देणार्‍या गुंतवणूकीमध्ये गणले जाते. त्यामुळे आता त्यात बरेच लोक गुंतवणूक करत आहेत. किसान विकास पत्रातील (KVP) गुंतवणूकीमुळे 6.9 टक्के व्याज मिळते. जो इतर कोणत्याही बँकेच्या तुलनेतील एफडीवर मिळालेल्या व्याजापेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे यात आपण 1000 रुपयांनी गुंतवून गुंतवणुकीस सुरुवात करु शकता. तर जास्तीत जास्त तुम्हाला यात कितीही गुंतवणूक करता येते. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक यात गुंतवणूक करु शकतात. तर अडीच वर्षांनंतर तुम्हाला यातून पैसे काढता येतात.

SBI Fixed Deposit काय खास?

देशातील सर्वात मोठी बँक SBI Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 5.40 टक्के व्याज देते. या दोघांच्या व्याजदरात खूप मोठा फरक आहे. आपण एसबीआयमध्ये 7 दिवस ते 10 वर्षांसाठी एफडी करू शकता. या कालावधीच्या आधारे बँक तुम्हाला त्यावर 2.9 ते 5.4 टक्के व्याज देते. पण 5 वर्ष गुंतवणूक केल्यास सर्वाधिक व्याज मिळते. यामध्येसुद्धा आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे.

कुठे होतील पैसे लवकरच दुप्पट

किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूकीवर जास्तीत जास्त व्याज 6.90 टक्के आणि एसबीआय एफडीमध्ये जास्तीत जास्त व्याज 5.40 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही नियम क्रमांक 72 नुसार केव्हीपीमध्ये पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला 10 वर्षे 4 महिने लागतील. तर दुसरीकडे याच नियमानुसार, तुम्ही एसबीआयमध्ये गुंतवणू केली तर पैसे दुप्प्ट होण्यासाठी 13 वर्ष 4 महिन्यांचा अवधी लागेल. (Post Office Vs Bank Which Is Better for Investment plan doubles money early)

संबंधित बातम्या : 

Income Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…

देशात आजपासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? यादी एका क्लिकवर

LIC च्या ‘या’ योजनेत दररोज 333 रुपये गुंतवा, पॉलिसी कालावधी संपल्यावर 70 लाख मिळवण्याची संधी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.