एका दशकात शेअर बाजाराचा 300 लाख कोटींचा टप्पा पार; कंगना रणौतचं ट्विट आलं चर्चेत

Kangana Ranaut : भारतीय शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षांत मोठा पल्ला गाठला. या दशकात बाजाराने मोठी घौडदौड केली. आज तर बाजाराने 75,000 अंकांचा टप्पा पण ओलांडला. तर निफ्टीने पण रेकॉर्डचे तोरण लावले. सिनेअभिनेत्री ते आता नेता असा प्रवास करणाऱ्या कंगणा रणौतने यावर तिची अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एका दशकात शेअर बाजाराचा 300 लाख कोटींचा टप्पा पार; कंगना रणौतचं ट्विट आलं चर्चेत
शेअर बाजाराची घौडदौड, कंगनाचे ट्विट चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 11:49 AM

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही वर्षात मोठी मजल मारली. निफ्टी आणि सेन्सेक्सने मोठा पल्ला गाठला. गेल्या 10 वर्षांत शेअर बाजाराने मोठी मुसंडी मारली. बाजाराच्या या दैदिप्यमान यशाने गुंतवणूकदार हरकून गेला आहे. बाजाराने या काळात मोठे चढउतार पाहिले आहे. शेअर मार्केटने मंगळवारी विक्रमाची गुढी उभारली. सेन्सेक्सने 75,000 अंकांचा टप्पा आलोंडला तर मंगळवारी एक नवीन रेकॉर्ड केला. निफ्टी 22,765.10 अंकावर उघडला. बॉलिवूड अभिनेत्री ते आता नेता सा प्रवास करणाऱ्या कंगणा रणौतने या घौडदौडीचे कौतुक केले आहे. भारतीय शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षांत 300 लाख कोटींचे मार्केट कॅप वाढवल्याची आकडेवारी कंगणाने दिली. तिने 2014 ते 2024 या काळातील आकडेवारी मांडली.

काय केले ट्विट

हे सुद्धा वाचा

कंगणाने ट्विट केले आहे. “ भारतीय इतिहासात पहिल्यांदाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वरील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ही चौपट वाढ केवळ या 10 वर्षांत झाली. मार्च 2014 (काँग्रेस सरकार)- 100 लाख कोटी, एप्रिल 2024 (मोदी सरकार)- 400 लाख कोटी रुपये. केवळ एका दशकात 300 लाख कोटी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर अतूट विश्वास दाखवला आहे.”

आज काय झाले ?

सकाळच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स 75,124.28 अंकावर उघडला. हा सर्वकालीन उच्चांक आहे. तर सोमवारी मुंबई निर्देशांक 74,742.50 अंकांवर बंद झाला होता. सकाळी विक्रम नावावर केल्यावर सेन्सेक्समध्ये किंचित घसरण दिसून आली. पण लवकरच बाजाराने जम बसवला. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांवर सेन्सेक्स 338 अंकांनी वधारला. तो 75,080.24 अंकावर ट्रेड करत होता. तर सकाळच्या सत्रात निफ्टी तेजीसह 22,713.35 अंकावर व्यापार करत होता.

गेल्यावर्षी 300 कोटींचा ओलांडला टप्पा

सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 425.62 अंकांच्या उसळीसह 74,673.84 विक्रमी अंकावर पोहचला. बाजारातील तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारीतील भांडवल 4,01,16,018.89 कोटी रुपयांवर पोहचले. हा सर्वकालीन उच्चांक आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 300 लाख कोटी रुपयांचा आकडा पार झाला होता. भारतीय बाजाराने गेल्या एकावर्षात 100 लाख कोटी रुपये जमा केले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.