Modi Government : मोदी सरकारची जबरदस्त स्कीम! 10 लाख मिळवा

Modi Government : मोदी सरकारच्या या योजनेत तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील.

Modi Government : मोदी सरकारची जबरदस्त स्कीम! 10 लाख मिळवा
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 10:27 PM

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने (Central Government) तरुणांना आणि व्यावसायिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांमधून छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहनच नाहीतर आर्थिक मदतही मिळते. होतकरु व्यावसायिकांना या योजनेतून मोठी रक्कम आर्थिक मदत (Financial) म्हणून मिळते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होतात. त्यांना वेळीच आर्थिक सहाय्य मिळाल्याने व्यवसाय करण्यास मदत मिळेल. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना (MUDRA Yojana) असे आहे. या योजनेत व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेत ग्राहकांना वेगवेगळे फायदा देण्यात येतात. पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) एप्रिल 2015 मध्ये सुरु करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (PM Mudra Loan-PMMY) तरुण व्यावसायिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या आर्थिक वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न या योजनेमुळे साकार झाले आहे. तर काहींच्या स्वप्नांना मुद्रा कर्ज योजनेतील निधीने उभारी दिली आहे. कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची (Capital) आवश्यकता असते. ही अडचण लक्षात घेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे.

हे सुद्धा वाचा

मुद्रा कर्ज योजनेला त्यामुळेच तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण द्यावे लागत नाही. प्रक्रिया शुल्कही अर्जदाराकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात मुद्रा कर्ज योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत छोट्या व्यावसायिक कर्जाचे वाटप करण्यात येते. कर्ज वाटपाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षीच्या मध्यापर्यंत 1,08,632 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. 2021 मध्ये सप्टेंबरच्या शेवटी मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सुमारे 98 हजार कोटी कर्ज वाटप करण्यात आले होते.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका लघु व्यावसायिक कर्जांचे प्रमुख माध्यम आहेत. मुद्रा लोनमध्येही त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. एकूण कर्ज वितरणात त्यांचा वाटा 55 टक्क्यांहून अधिक आहे. तर खासगी व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, एमएफआयएस आणि एनबीएफसीएस यांचा उर्वरित हिस्सा आहे.

मुद्रा कर्ज योजनेसाठी सरकारी बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकाकजे अर्ज करता येतो. RBI ने सार्वजनिक क्षेत्रातील 27 बँका, 17 खाजगी बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 सूक्ष्म वित्तीय संस्था आणि 25 NBFC यांना मुद्रा कर्ज वाटप करण्यासाठी अधिकृत केले आहे.

बँका, वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी चौकशी करु शकता. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ अथवा www.udyamimitra.in ला भेट देऊ शकता. याठिकाणी अर्ज डाउनलोड करता येईल.

त्यानंतर सर्व तपशील भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील सोपास्कार आणि प्रक्रिया संबंधित बँकेतील शाखा व्यवस्थापक करतो.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.