Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stocks : दौडा दौडा भाग भागसा! या चवन्नीछाप शेअरने केले मालामाल

Penny Stocks : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर बुधवारी 4.80 टक्के तेजीसह इतक्या रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 120 कोटी रुपयांचे आहे. विशेष म्हणजे कंपनीचा पीई रेशो पण कमी आहे. त्याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होईल.

Penny Stocks : दौडा दौडा भाग भागसा! या चवन्नीछाप शेअरने केले मालामाल
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 7:04 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : कॅनडाशी सुरु झालेल्या शाब्दिक चकमकीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला. बाजारात जवळपास 800 अंकांची घसरण दिसून आली. पण या घसरणीतही काही स्टॉकनी जोरदार कामगिरी बजावली. यामध्ये एका पेनी स्टॉकने (Penny Stock) पण भर घातली. गुंतवणूकदारांचा खिसा गरम केला. हा पेनी स्टॉक जवळपास 5 टक्के तेजीसह बंद झाला. पडत्या काळात या स्टॉकने जबरदस्त कामगिरी केल्याने तज्ज्ञांनी या पेनी स्टॉकवर भरवसा दाखवला आहे. त्यांच्या मते, येत्या काळात हा शेअर थोडा थोडका नाही तर 400 टक्के परतावा देऊ शकतो. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी या स्टॉकच्या घडामोडींकडे लक्ष दिले आहे.

कोणती आहे ही कंपनी

Pressure Sensitive Systems India असे या कंपनीचे नाव आहे. या शेअरमध्ये पडत्या काळात जवळपास 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. बुधवारी बीएसईवर हा शेअर 4.80 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 8.08 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 120 कोटी रुपये आहे. या कंपनीचा शेअर एका दिवसापूर्वी 7.71 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

तीन महिन्यात 400 टक्के परतावा

या कंपनीचा शेअर 8 रुपयांना आहे. शेअर बाजारात तो हॉकिश झाला आहे. तज्ज्ञांच्या मते तीन महिन्यात हा शेअर 40 रुपयांचा पल्ला गाठू शकतो. म्हणजे पुढील तीन महिन्यात हा शेअर 5 पट म्हणजे 400 टक्के इतका परतावा देऊ शकतो. गुंतवणूकदारांना सर्वात चांगली बाब म्हणजे या कंपनीचा पीई रेशो सर्वात कमी आहे. हा पीई रेशो सध्या 1.27 आहे. त्यामुळे पण गुंतवणूकदार त्याकडे आकर्षीत झाले आहेत.

कंपनीची जोरदार कामगिरी

जून तिमाहीत कंपनीने जोरदार कामगिरी केली. कंपनीने या तिमाहीत 96 कोटी रुपयांचा एकूण महसूल गोळा केला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीची कमाई घसरली होती. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत कंपनीला चांगला फायदा झाला. कंपनीने 41 कोटी रुपयांची कमाई केली. जून तिमाहीत कंपनीने 38 कोटी रुपयांचा एकूण नफा झाला. आर्थिक वर्ष 2022 मधील याच कालावधीत या कंपनीचा नफा शून्य होता. जून तिमाहीत या कंपनीने एक कोटी 38 लाख रुपयांचा नफा मिळवला. गेल्यावर्षी कंपनीचे नफ्याचे खाते उघडले नव्हते.

सिंगापूरच्या कंपनीकडून ऑर्डर

प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअरने जोरदार आघाडी घेण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात सिंगापूरच्या एका कंपनीकडून मिळालेली ऑर्डर हे पण एक कारण आहे. त्यामुळे हा शेअर येत्या काही दिवसात जोरदार कामगिरी बजावेल अशी आशा आहे. सिंगापूरच्या आयटी फर्मने 76 कोटींची ऑर्डर दिली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.