Inflation | महा’गाई’राष्ट्र! भाऊ, महागाईत आपला महाराष्ट्र कितव्या स्थानी, माहिती आहे का?

Inflation | महागाईने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. महागाई तिच्या सर्वोच्च पातळीवर आहे. यापूर्वीही महागाई वाढली असे नाही. पण तीच एकाचवेळी सर्वच क्षेत्रात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. सरकार महागाई काबूत करण्याच्या आघाडीवर सपशेल आपटले आहे.

Inflation | महा'गाई'राष्ट्र! भाऊ, महागाईत आपला महाराष्ट्र कितव्या स्थानी, माहिती आहे का?
महागाई राष्ट्रImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 7:24 PM

Inflation | महागाईने (Inflation) सर्व रेकॉर्ड (Record Break) तोडले आहेत. महागाई तिच्या सर्वोच्च पातळीवर आहे. यापूर्वीही महागाई वाढली असे नाही. पण तीच एकाचवेळी सर्वच क्षेत्रात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. सरकार महागाई काबूत करण्याच्या आघाडीवर सपशेल आपटले आहे. इंधन (Petrol-Diesel Price) दरवाढ गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी दरवाढ आहे. इंधनाने शंभरी पार केलेली आहे. तर खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीतही मोठी वाढ झालेली आहे. खाद्यपदार्थांवर जीएसटी लागल्याने दैनंदिन जीवनातील (Daily Needs) दही, ताक महागले आहे. खाद्यांन्न आणि दाळीच्या किंमतीतही भरघोस वाढ झाली आहे. वीज महागाईली आहे. बस, रेल्वेचे भाडे वाढले आहे. प्रत्येक क्षेत्रावर महागाईने कब्जा केला आहे. सरकारचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने महागाई काबूत आणण्यात यश येत नसल्याचे चित्र आहे.

देशाचा महागाई दर किती?

संपूर्ण देशात सर्वसामान्य नागरिक महागाईने वैतागून गेला आहे. कमाई, उत्पन्न महागाईपुढे तोकडे पडत आहे. महागाई दर जवळपास 7 टक्क्यांवर पोहचला आहे. पण राज्यांमधील महागाईचा दर वेगवेगळा आहे. काही राज्यांत महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईने देशाच्या महागाई दराला ही मागे टाकले आहे. तर काही राज्यातील महागाई दर अगदी नगण्या आहे. तो देशाच्या महागाई दराशी व्यस्त प्रमाणात आहे.

सर्वाधिक महागाई कुठे ?

देशात सर्वाधिक महागाई तेलंगाणा राज्यात आहे. 8.32 टक्के महागाई दर आहे. हा दर देशाच्या महागाई दरापेक्षा अधिक आहे. देशातील 14 राज्यात महागाई दर जास्त आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, 8.06 टक्के तर सिक्किममध्ये 8.01 टक्के महागाई आहे. त्यानंतर अनेक राज्यांचा क्रमांक लागतो.

हे सुद्धा वाचा

आपला महाराष्ट्र कुठे आहे?

महागाईत महाराष्ट्रही अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा राज्यातील इंधनाचे दर जास्त आहे. वीज दरातही वाढ करण्यात आली आहे. भाजीपाला, मसाले, अन्नधान्य, खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना कुठेच दिलासा मिळालेला नाही. महाराष्ट्रात महागाईचा दर 7.7 टक्के आहे. देशाच्या महागाई दरापेक्षा अर्थातच राज्याचा महागाई दर जास्त आहे. पण इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात महागाई कमी आहे. मध्यप्रदेशमध्ये महागाई 7.52, आसाममध्ये 7.37, उत्तर प्रदेशात 7.27, गुजरातमद्ये 7.2, जम्मू-काश्मीरमध्ये 7.2 तर राजस्थानमध्ये 7.1 टक्के महागाई आहे.

मग महागाई आहे तरी कुठे कमी?

आता तुम्ही म्हणाल, अशा परिस्थितीत महागाई कमी असलेले ठिकाण असेल? तर डेटा नुसार, मणिपुरमध्ये महागाई सर्वात कमी आहे. या ठिकाणी महागाईचा दर 1.07 टक्के आहे. तर मेघालयात महागाई दर 3.84 टक्के आणि गोव्यात महागाईचा दर 3.66 टक्के इतका आहे. देशाच्या महागाई दरापेक्षा हे प्रमाण खूप कमी आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.