Petrol Diesel Price Today : नागरिकांना किती दिवस करणार एप्रिल फुल! इंधनाचे दर कधी होतील कमी

Petrol Diesel Price Today : गेल्या वर्षभरापासून रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाची आयात होत असल्याची दवंडी पिटत आहे. पण जनतेला अजूनही चढ्यादरानेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. भाव वाढले नसले तरी कमी ही झालेले नाही, वर्षभरापासून सुरु असलेले हे एप्रिल फुल थांबणार तरी कधी?

Petrol Diesel Price Today : नागरिकांना किती दिवस करणार एप्रिल फुल! इंधनाचे दर कधी होतील कमी
थांबवा की एप्रिल फुल
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:26 AM

नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) कसलाच बदल झालेला नाही. दरवाढ झालेली नाही. पण गेल्या वर्षभरात अनेकदा इंधन दर कपातीच्या जरतरच्या चर्चा मात्र केंद्र सरकारने रंगवल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून ते पेट्रोलियम मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्यांची मते मांडली. देशात दोन वर्षांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आतापेक्षा कमी होत्या.गेल्या वर्षभरापासून रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाची (Crude Oil Price) आयात होत असल्याची दवंडी पिटत आहे. पण जनतेला अजूनही चढ्यादरानेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. भाव वाढले नसले तरी कमी ही झालेले नाही, वर्षभरापासून सुरु असलेले हे एप्रिल फुल थांबणार तरी कधी?

जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असतानाही भारतात इंधनाचे दर अधिक होते. त्यानंतर गेल्या वर्षी 22 मे रोजी कर कपात झाली. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) वधारले. किंमती 75.67 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 79.77 डॉलर प्रत‍ि बॅरल झाले.

करासंबंधी असा झाला बदल

हे सुद्धा वाचा
  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचा दर (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.51 तर डिझेल 93.02रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.70 पेट्रोल आणि डिझेल 93.20 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.41 आणि डिझेल 92.92 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 93.41 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.38 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.72 रुपये तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.