Gold Silver Rate Today : 24 कॅरेट सोने घसरले, चांदी तर 70 हजारांच्या आत, जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Rate Today : सध्या सराफा बाजारात स्वस्ताईचा पाऊस पडत आहे. सोने-चांदीत घसरण सुरु आहे. सोने तर रेकॉर्ड पेक्षा सर्वात तीन ते चार हजारांनी उतरले आहे. तर चांदीचा पण तोरा घसरला आहे. दोन्ही धातूच्या किंमतीत असा फरक दिसला. काय आहे भाव..

Gold Silver Rate Today : 24 कॅरेट सोने घसरले, चांदी तर 70 हजारांच्या आत, जाणून घ्या आजचे भाव
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 9:32 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याने आनंदवार्ता आणली आहे. सोन्याच्या किंमती रेकॉर्डस्तरावर दणकावून आपटल्या आहेत. ज्यांनी सोने दोन-तीन महिन्यात मोठा परतावा देणार म्हणून गुंतवणूक केली. त्यांना आता धीर ठेवावा लागणार आहे. सोने कधी उसळी घेते, याची वाट पहावी लागणार आहे. गेल्या दोन महिन्यात सोन्यात मोठी उसळी आली नाही. तर चांदीने मध्यंतरी एकहाती दरवाढीचे विमान उडविण्याचा केलेला प्रयत्न फसला. चांदी पण जमिनीवर आली आहे. डॉलर मजबूत स्थिती असून रशिया-युक्रेन युद्धाचा 16 महिन्यानंतरही निकाल लागलेला नाही. त्यामुळे जागितक बाजारात सोने -चांदी दबावाखाली आहे. सोने-चांदीचे दर (Gold Silver Price Today) कधी वधारणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण तोपर्यंत ग्राहकांची चांदी झाली, हे मात्र निश्चित.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, सोमवारी, 3 जुलै रोजी सोने उतरले. महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 जुलै रोजी सोने महागले होते.30 जून आणि जुलै महिन्याच्या पहिली तारीख अशा दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. 24 कॅरेट सोने 320 रुपयांनी वधारले. भाव 59,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 22 कॅरेट सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली. हा भाव प्रति 10 ग्रॅम 54,300 रुपयांवर पोहचला होता. तर सोमवारी, 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी उतरले. भाव प्रति 10 ग्रॅम 59,120 रुपये झाला. गुडरिटर्न्सनुसार या किंमती आहेत.

जून महिन्यात किंमती आटोक्यात गुडरिटर्न्सनुसार,जून महिन्यात सोन्याच्या आघाडीवर दिलासा मिळाला. 1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले होते. 29 जून रोजी पुन्हा घसरण झाली. हा भाव 58,900 रुपयांवर आला होता. 30 जून रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 59,000 रुपयांवर पोहचले.

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 3 जुलै रोजी 24 कॅरेट सोने 58,122 रुपये, 23 कॅरेट 57,889 रुपये, 22 कॅरेट सोने 53,240 रुपये, 18 कॅरेट 43,592 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34001 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.