AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance News | खुशखबर, विमाही होणार स्वस्त, सरकारचा हा मास्टर स्ट्रोक

Insurance News | विम्याच्या क्षेत्रातही आता क्रांतीची नांदी येणार आहे. एजंटचे कमिशन कमी होणार असल्याने विमा घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्यात येणार आहे.

Insurance News | खुशखबर, विमाही होणार स्वस्त, सरकारचा हा मास्टर स्ट्रोक
विमाही स्वस्तImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 26, 2022 | 12:56 PM
Share

Insurance News | विम्याचे कवच (Insurance Coverage) प्रत्येकाला हवे असते. पण गरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला एवढंच नाहीतर अनेक मध्यमवर्गीय लोकांनाही विमा घेणे परवडत नाही. त्यामागे विम्याच्या जादा हप्त्याचे (Insurance premium) कारण असते. जास्त प्रिमियममुळे अनेकांना इच्छा असूनही विमा पॉलिसी खरेदी करता येते नाही. पण आज तुमच्यासाठी खुशखबरी आहे. लवकरच सरकार एजंटचे कमिशन निश्चित करणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कमिशनवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळ सर्वसामान्य व्यक्तीलाही विमा संरक्षण मिळेल. त्यालाही स्वस्तात विमा खरेदी करता येणार आहे. याचा फायदा कंपन्यांसोबत विमा क्षेत्रालाही होणार आहे. भारतातील मोठा वर्ग आजही विम्यापासून कोसो दूर आहे. या वर्गापर्यंत पोहचण्यास विमा कंपन्यांना सोप्पं होणार आहे. हा निर्णय विमा क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार आहे. या माध्यमातून विमा क्षेत्राला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

काय आहे योजना

भारताच्या विमा क्षेत्राच्या जलद विकासासाठी, IRDAI विमा एजंट्सचे कमिशन निश्चित करणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना विमा कंपन्यांसह एजंटला पाठवण्यात आली आहे. कमिशनविषयीचे धोरणही स्पष्ट करण्यात आले आहे. आयुर्विमा महामंडळ आणि इतर विमा एजंट्सचे कमिशन 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे पॉलिसीच्या किंमती झपाट्याने कमी होतील. त्याचा फायदा विमा क्षेत्राला जसा होईल तसाच सर्वसामान्य विमा खरेदीदाराला ही होईल.

दरवर्षी आढावा

एजंट्सचे कमिशन निश्चित करण्याचा अंतिम निर्णय कंपनीच्या बोर्डाचा राहिल. त्यासोबतच दरवर्षी धोरणाचा आढावा घेण्याच्या सूचनाही प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे विमा वाढीव भर देण्यात येणार आहे, विमा कमिशन वाढीवर नाही.

बड्या कंपन्यांचा फायदा

विमा क्षेत्रातील बड्या कंपन्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. परंतु, लहान आणि नवीन कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा निर्णय अडचणीचा ठरु शकतो. तर अर्धवेळ विमा एजंट म्हणून काम करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

मिशन कम कमिशन

प्राधिकरणाने कमिशन कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे यापूर्वी पॉलिसी वाढवण्यासाठी कंपन्या एजंटला 40 टक्क्यांपर्यंत कमिशन देत होत्या. त्यावर टाच येणार आहे. विमा एजंट्सना विमा पॉलिसी तयार करताना मिळणारे कमिशन 20 टक्के निश्चित केले जाईल. यासोबतच विमा पॉलिसीच्या सिंगल प्रीमियमच्या नूतनीकरणावर 10 टक्के कमिशन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.