Share Market : गुंतवणुकीच्या या गर्तेत अडकू नका..शेअर बाजारात Pump And Dump चा धंदा तेजीत

Share Market : शेअर बाजारात जशी भरमसाठ कमाई होते, तसेच फसवणुकीचे अनेक सापळेही आहेत..तेव्हा सावध रहा..

Share Market : गुंतवणुकीच्या या गर्तेत अडकू नका..शेअर बाजारात Pump And Dump चा धंदा तेजीत
शेअर बाजारातील फसवणुकीपासून सावध रहाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 9:24 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Stock Market) कमाईची कोणतीच मर्यादा नाही. पण त्यासाठी या बाजाराचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. नाहीतर फसवणुकीचे अनेक सापळे (Many traps of deception) तुमच्या कष्टाचा पैसा अलगद संपून टाकतील. तेव्हा सावध रहा, सावज होऊ नका..

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक जणाला बाजाराचा नाळ काही माहिती नसते. या कारणामुळे अनेक गुंतवणूकदार शेअर खरेदी आणि विक्री करताना तज्ज्ञांचा, विविध अॅपचा वापर करतात.

काही लोकं नेमकं याचाच फायदा उचलतात. ते गुंतवणूकदार सल्लागार होऊन, सल्ला देत, तुम्हाला गार करतात. हे सल्लागार सावज हेरुन त्यांना मोठी गुंतवणूक करायला लावतात आणि त्यामाध्यमातून त्यांचा फायदा करुन घेतात.

हे सुद्धा वाचा

हे सल्लागार, तज्ज्ञ अगोदरच एखादा शेअर खरेदी करुन ठेवतात. त्यामध्ये लोकांना गुंतवणूक करायला लावतात. त्यामुळे शेअर बाजारात हा शेअर तेजीत येतो आणि त्याची किंमत वाढते.

शेअरचा बाजारातील भाव वधरला की, तज्ज्ञ त्याचे शेअर विकून मालामाल होतो. या प्रॅक्टिसला, फसवणुकीला पम्प आणि डम्प (Pump and Dump) घोटाळा म्हणतात. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरु आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा.

आजही पम्प आणि डम्पचा प्रकार सर्रास सुरु आहे. टेलिग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप यासारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर बाजाराच्या ग्रुपचा सुळसुळाट आला आहे. टिप्सच्या नावाखाली, फुकट सल्ला देण्याच्या आडून ते त्यांची पोळी भाजून घेत आहेत.

जानेवारी 2022 मध्ये सेबीने (SEBI) टेलिग्रामवरील ‘बुल रन’ चॅनेलवर थेट कारवाई केली होती. हे चॅनल 6 लोक चालवित होते. ते अगोदर शेअर खरेदी करायचे आणि इतरांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त करायचे.

शेअर बाजारातील या शेअर बाबत हा ग्रुप हवा करत असे. त्या कंपनीविषयी वरचढ माहिती द्यायचे. त्यानंतर शेअरचा भाव वधरला की, ते विकून टाकायचे. या 6 लोकांनी या पद्धतीने लोकांना चुना लावत 2.84 कोटी रुपयांची अवैध कमाई केली.

त्यामुळे बाजारात एका दिवसात कोणीच श्रीमंत होत नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्याही बातमीच्या, सल्ल्याच्या आधारे लागलीच शेअरची विक्री अथवा खरेदी करु नका. बाजाराविषयीचा, कंपनी विषयीचा तुमचा अभ्यास वाढवा.

sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड
sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड.
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा.
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.