Success Story | वडील विकायचे फळे, मुलाने उभारली 400 कोटीची आईस्क्रीम कंपनी

रघुनंदन यांनी आईस्क्रीम विकायला सुरु केले तेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये जादा ग्राहक येत नव्हते. तेव्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एक आयडीया केली...

Success Story | वडील विकायचे फळे, मुलाने उभारली 400 कोटीची आईस्क्रीम कंपनी
Raghunandan-Srinivas-Kamath
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 9:49 PM

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : कोणत्याही व्यवसायासाठी मेहनत आणि चिकाटी गरजेची असते. जुहू कोळीवाड्यातून या उद्योजकाने व्यवसाय सुरु केला. आणि 400 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. यशाची ही कहानी जिभेवर कायम चव रेंगाळणाऱ्या आईस्क्रीमच्या एका ब्रॅंडची आहे, त्याचे नाव आहे नॅचरल आईस्क्रीम. ( Natural Ice Cream ) 1984 मध्ये मुंबईत रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांनी हे आईस्क्रीम लोकप्रिय होण्यासाठी खूप मेहनत घेतली. तेव्हा कुठे या कंपनीचा टर्नओव्हर 400 कोटीपर्यंत पोहचला.

रघुनंदन कामत यांचे वडील कर्नाटकातील मंगळुरू येथील एका छोट्या गावात आंबे विकायचे. वडीलांकडून त्यांनी फळांची निवड करणे त्यांना सुरक्षित प्रीजर्व्ह करणे आदी गुण शिकले. नंतर ते नशीब आजमवायला मुंबईत आले. रघुनंदन यांनी 14 फेब्रुवारी 1984 मध्ये आपला आईस्क्रीम ब्रॅंड नॅचरल मुंबईच्या जुहू कोळीवाड्यात सुरु केला. तेव्हा त्यांच्याकडे चार कर्मचारी होते आणि आईस्क्रीमचे 10 फ्लेवर त्यांनी बाजारात आणले.

पावभाजी विकावी लागली

रघुनंदन यांनी आईस्क्रीम विकायला सुरु केले तेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये जादा ग्राहक येत नव्हते. त्यामुळे आपल्याकडे पावभाजी विकायला त्यांनी सुरुवात केली. तिखट पावभाजी खाल्यानंतर लोक काही तरी गोड खायला हवे म्हणून नॅचरल आईस्क्रीम खाऊ लागले. ते केवळ फळे, दुध आणि साखर यापासून चविष्ठ आईस्क्रीम तयार करीत होते. त्यानंतर हळूहळू हा आईस्क्रीम ब्रॅंड नावारुपाला आला. ग्राहकांची संख्या वाढू लागली. 200 चौरस फूटाच्या दुकानात पहिल्या वर्षी 5,00,000 रुपयांचा व्यवसाय झाला. त्यानंतर त्या्ंनी पावभाजी बंद करून फळांच्या पाच फ्लेवरचे आईस्क्रीम बाजारात आणले. त्यात कस्टर्ड एप्पल, काजू किशमिश, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉब्रेरी फ्लेवर आणले.

20 फ्लेवरचे आईस्क्रीम

आज नॅचरल आईस्क्रीमचे देशभरात 135 हून अधिक आऊटलेट आहेत. शहाळे, जांभुळ, पेरु, चिकू, सीताफळ आदी 20 फ्लेवरचे आईस्क्रीम त्यांनी बाजारात आणले. मिडीयाच्या बातमीनूसार त्यांचा टर्नओव्हर 400 कोटी आहे. कामथ यांनी चार दशकांपासून आपला दर्जा कायम राखला आहे. त्यात ते कोणताही रंग किंवा केमिकल वापरत नाहीत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.