IPL Cheerleaders : आयपीएल चीअर लीडर्सची इतकी कमाई, तुमचा डोळ्यावर विश्वास बसणार नाही!

IPL Cheerleaders : सध्या सगळीकडे आयपीएलचा फिव्हर आहे. यातील चीअर लीडर्स आपले लक्ष वेधून घेतात. जलद क्रिकेट जगतात आता क्रिकेटसोबतच इतर अनेक गोष्टींना महत्व आले आहे. तर या चीअर लीडर्सच्या मानधनाचे आकडे तुम्हाला हैराण करणारे आहेत.

IPL Cheerleaders : आयपीएल चीअर लीडर्सची इतकी कमाई, तुमचा डोळ्यावर विश्वास बसणार नाही!
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:25 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे आयपीएलची (IPL) धमाकेदार सुरुवात झाली. आयपीएल-16 क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. प्रत्येक दिवशी हे निर्णायकी आणि उत्कंठावर्धक सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची मैदानावर गर्दी होत आहे. केवळ मैदानावरच नाही तर ऑनलाईन, टीव्हीवरील प्रेक्षकांची संख्या तर अफाट आहे. . IPL मध्ये चर्चित क्रिकेटर, उद्योगपती, स्पॉन्सरसह अनेक जण जोडल्या गेले आहे. खेळात क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार आहे. सगळीकडे आयपीएलचा फिव्हर आहे. यातील चीअर लीडर्स (Cheerleaders Income) आपले लक्ष वेधून घेतात. जलद क्रिकेट जगतात आता क्रिकेटसोबतच इतर अनेक गोष्टींना महत्व आले आहे. तर या चीअर लीडर्सच्या मानधनाचे आकडे तुम्हाला हैराण करणारे आहेत.

कोविडमध्ये बंदी मैदानावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअर लीडर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या चीअर लीडर या परदेशी असतात. त्यात काही भारतीय चेहरे पण आहेत. कोरोना काळात चीअर लीडरचे भवितव्य धोक्यात आले होते. त्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला होता. त्यांना प्रवेश बंदी होती. कोरोनाचे मळभ कमी झाल्यावर या फास्ट क्रिकेटमध्ये त्यांनी पुन्हा स्थान पटकावले. त्यांच्या कमाईबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. कोणाला वाटते त्या लाखो रुपये कमवितात. काहींचा दावा आहे की, त्यांना तगडा पगार मिळतो.

किती करतात कमाई IPL चीयरलीडर्सची एका मॅचची कमाई लाखोंमध्ये मुळीच नसते. तर ती काही हजारात असते. त्यामुळे या चीअरलीडर्स एका दिवसात बक्कळ कमाई करतात, हे मिथकच ठरते. तर एका आयपीएल मॅचसाठी त्यांना 14 ते 17 हजार रुपयांचा मेहनताना मिळतो. मीडियातील सूत्रांनी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

किती देतात पेमेंट मीडिया सोर्सनुसार, चीअर लीडर्संना 17 हजार ते 24,000 रुपयांपर्यंत ही पेमेंट करण्यात येते. CSK, पंजाब, सनराइज हैदराबाद, दिल्ली कॅपिटल चीयरलीडर्सला एका मॅचसाठी 12,000 रुपये मोजतात अथवा त्यापेक्षा पण अधिक देतात. तर मुंबई आणि RCB 20,000 रुपये प्रति मॅच पेमेंट करते. सर्वाधिक पेमेंट KKR ही टीम करते. चीअरलीडर्सला ही टीम 24,000 रुपये प्रति मॅच पेमेंट करते.

टीम जिंकल्यास मोठा फायदा केवळ पेमेंटवरच हा आकडा थांबत नाही. ज्या टीमच्या चीअर लीडर्स असतात, त्या टीमने सामना जिंकला तर त्यांना बोनस देण्यात येतो. तसेच चीअरलीडर्सला इतर ही अनेक फायदे देण्यात येतात. त्यांना आलिशान सामानापासून ते खाद्यपदार्थपर्यंतच्या सर्व सुविधा पुरविण्यात येतात.

कशी होती निवड IPL मध्ये चीअरलीडर्सचा जॉब मिळविणे सोपे काम नाही. त्यासाठी काही नियम आहेत. शरीराच्या ठेवणपासून आयपीएल मॅचमध्ये सलग काही तास न थकता कामगिरी बजाविण्यापर्यंतच्या सगळेच मूल्यांकन करण्यात येते. चीअर लीडर्सला चांगला डान्स, मॉडेलिंग, गर्दीसमोर कामगिरी बजावणे यासारख्या गोष्टींचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.