Rakesh Jhunjhunwala : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं गारुड कायम, गुंतवणूकदार आजही गिरवतात धडे

Rakesh Jhunjhunwala : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं गारुड आजही कायम आहे. गुंतवणूकदार आजही कमाईसाठी त्यांचे धडे गिरवतात. त्यांनी गुंतवणुकीचा दिलेला मंत्र आजही कसोशीने पाळतात. गुंतवणूकदारांनी त्यांच्या आठवणी आणि सल्ले जपून ठेवले आहेत.

Rakesh Jhunjhunwala : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं गारुड कायम, गुंतवणूकदार आजही गिरवतात धडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 8:43 AM

नवी दिल्ली : देशातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आपल्यातून निघून आता एक वर्ष होत आले आहे. आज (5 जुलै) त्यांचा जन्मदिवस आहे. भारतीय शेअर बाजारातील बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे म्हणून ते लोकप्रिय होते. 14 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे 62 व्या वर्षी निधन झाले होते. निधनानंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला त्यांनी उभारलेले साम्राज्य सांभाळत आहेत. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं गारुड आजही कायम आहे. गुंतवणूकदार आजही कमाईसाठी त्यांचे धडे गिरवतात. त्यांनी गुंतवणुकीचा दिलेला मंत्र आजही कसोशीने पाळतात.

5000 रुपये खिशात राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. केवळ 5000 रुपये घेऊन शेअर बाजारात दाखल झालेल्या झुनझुनवाला यांची गणना देशातील आघाडीच्या श्रीमंतांच्या यादीत होते. झुनझुनवाला हे भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार होते. त्यांच्या गुंतवणुकीच्या टिप्स आजही गुंतवणूकदार फॉलो करतात.

वडिलांकडून मिळाली प्रेरणा राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची प्रेरणा वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टड अकाऊंटचा(CA) अभ्यासक्रम पूर्ण केला.

हे सुद्धा वाचा

वडिलांचा मंत्र त्यांच्या व्यवसायात राकेश यांनी मदत करावी, असे वडिलांना वाटत होते. पण झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटचा रस्ता धरला. त्यासाठी त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. स्वतःच कमाई करायची आणि शेअर बाजारात गुंतवणूक करायची, असा सल्ला त्यांनी दिला. वडिलांचा हा सल्ला त्यांना मोलाचा वाटला. त्यांनी हा मंत्र आयुष्यभर पाळला.

टायटनने उघडले नशीब राकेश झुनवाला यांनी 2003 साली टाटा समूहाच्या टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या एका शेअरने त्यांचे नशीब पालटल्याचे बोलले जाते. त्यांनी सहा कोटी शेअर्स अवघ्या 3 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे खरेदी केले आणि या शेअर्सनी त्यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल ठरवले. आजही या शेअर्समध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि हा शेअर किंमती मानल्या जातो.

18 व्या वर्षी शेअर बाजारात स्टॉक्स निवडताना झुनझुनवाला चोखंदळ होते. ज्या स्टॉकवर कोणाचे लक्ष नसायचे असे ते निवडायचे आणि गुंतवणूक करायचे. या स्टॉकने त्यांना छप्परफाड कमाई करुन दिली. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा 40 वर्षांहून अधिक अनुभव होता. गुंतवणूकदारांनी त्याच्या टिप्स पाळल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला होता.

46 हजार कोटींचे साम्राज्य राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली. पुढील 37 वर्षांत म्हणजे 2022 पर्यंत त्यांची एकूण कमाई 5.8 अरब डॉलर (जवळपास 46.18 हजार कोटी रुपये) इतकी झाली. 2022 मध्ये ‘अकासा’ एअरलाईनच्या मदतीने त्यांनी विमान सेवा क्षेत्रात उडी घेतली होती. अनेक कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक होती. मृत्यूपूर्वी श्रीमंतांच्या यादीत त्यांचा 440 वा क्रमांक होता. कमाईतील 25% रक्कम ते दान करत असत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.