Rakesh Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांना लागली लॉटरी! एकाच महिन्यात कमावले इतके हजार कोटी

Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातील काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीत जोरदार नफा कमावून दिला आहे. ही कंपनी अजूनही फायदा करुन देत आहे. कोणती आहे ही कंपनी..

Rakesh Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांना लागली लॉटरी! एकाच महिन्यात कमावले इतके हजार कोटी
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 5:52 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : शेअर बाजार या दिवसांत त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. अनेक स्टॉकमधून गुंतवणूकदार चांगली कमाई करत आहे. आता दिवगंत राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबियांकडून पण याविषयीचे अपडेट समोर आले आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणूनओळखल्या जाते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर पत्नी त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहे. पतीने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक वाढवली होती. टाटाच्या या शेअरमुळे रेखा झुनझुनावाला (Rekha Jhunjhunwala) यांना एकाच महिन्यात मोठा फायदा झाला. एकाच महिन्यात त्यांना या शेअरने कित्येक पट परतावा दिला. या शेअरची निवड आणि त्यातील गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय इतक्या दीर्घकाळानंतर योग्य असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

या शेअरमधून मोठी कमाई

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या जीवनात अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक केली. त्यातील अनेक शेअर्सने त्यांना मालामाल केले. यामध्ये टायटन कंपनीच्या (Titan Share Price) शेअरचा पण समावेश होता. आता त्यांच्यानंतर पत्नी रेखा झुनझुनवाला यांना ही कंपनी फायदा मिळवून देत आहे. त्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. या शेअरमुळे त्यांना 1390 कोटींची कमाई करता आली आहे.

हे सुद्धा वाचा

टायटनचा शेअर

टायटन कंपनीचा शेअर हा राकेश झुनझुनावाला यांचा आवडता होता. या शेअरने बाजारातील गुंतवणूकदारांना आणि रेखा झुनझुनावाला यांना जोरदार रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात 16 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत या शेअरमध्ये जोरदार उसळी दिसून आली. हा शेअर 3011 रुपयांहून वाढून 3302 रुपयांपर्यंत पोहचला. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक केवळ 4.27 रुपयांना होता.

इतकी झाली कमाई

टायटन शेअरच्या किंमतीमधील ही वृद्धी रेखा झुनझुनावाला यांना फायदेशीर ठरली. त्यांच्या एकूण संपत्तीत एकाच महिन्यात जवळपास 1390 कोटींची वाढ झाली आहे. तर एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत टायटन कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे एकूण 4,75,95,970 शेअर आहेत. कंपनीच्या एकूण शेअरपैकी हा वाटा 5.36 टक्के आहे.

एलआयसी पण फायद्यात

रेखा झुनझुनवालाचा पोर्टफोलिओमध्ये या स्टॉकने सलग दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी केली. या आठवड्यातील चारही सत्रात या शेअर रेकॉर्ड केला. टायटन शेअरची किंमत वाढल्याचा फायदा रेखा झुनझुनवाला यांच्यासह भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअरला पण झाला आहे.

इतके वाढले मूल्य

टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 1,56,86,771 शेअर होते. हे कंपनीच्या एकूण भांडवलाच्या 1.77 टक्के आहे. केवळ एका महिन्यात टायटन शेअरमध्ये 10 टक्के वाढ झाल्याने एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 458 कोटी रुपयांनी वाढले आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....