Share : या शेअरमधील गुंतवणुकीने राकेश झुनझुनवाला झाले श्रीमंत, असा तयार केला भारताच्या वॉरेन बफेट यांनी पोर्टफोलिओ..
Share : भारताच्या वॉरेट बफेट, राकेश झुनझुनवाला यांच्या यशाचे रहस्य तरी काय..
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील वॉरेन बफेट (Warren Buffet) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) नेहमीच त्यांच्या पोर्टफोलिओमुळे (Portfolio) चर्चेत राहिले. त्यांनी कोणता शेअर खरेदी (Buy Share) केला, कुठे गुंतवणूक (Investment) केली. त्यांनी काय टिप्स दिल्या याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत असतं. आजही त्यांच्या पोर्टफोलिओची चर्चा होतेच.
दलाल स्ट्रीटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांपासून शेअर बाजारात सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. त्यांची एकूण संपत्ती 5.8 दशलक्ष रुपये इतकी आहे.
त्यांनी 1985 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली. त्यावेळी त्यांच्याकडे अवघे 5,000 रुपेय होते. टाटा समूहाचे शेअर हे नेहमीच त्यांची पहिली पसंती राहिली आहे. त्यामागे एक कारणही आहे. कारण याच शेअर्सनी त्यांना जबरदस्त कमाई करुन दिली होती.
टाटा टीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना 1986 मध्ये चांगला परतावा मिळाला. त्यावेळी त्यांनी टाटा टी कंपनीचे 5000 शेयर ₹43 प्रति शेअरप्रमाणे खरेदी केले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच हा शेअर 143 रुपये प्रति शेअर झाला.
या पहिल्याच गुंतवणुकीतून त्यांना कमालीचा फायदा झाला. टाटा टी कंपनीच्या शेअरने त्यांना तीन महिन्यांतच मालामाल केले. या शेअरमधून त्यांना 25 लाख रुपयांची कमाई झाली. बाजारातील ही त्यांची पहिली कमाई होती.
टाटा समूहावर त्यांचा पुढील 37 वर्षे विश्वास कायम राहिला. त्यांनी टाटा मोटर्स, इंडियन होटल्स कंपनी, टाटा कम्युनिकेशन्स आणि टाईटन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली. जून 2022 तिमाहीपर्यंत हे सर्व शेअर त्यांच्या पोर्टफोलिओत होते.
झुनझुनवाला हे एका खासगी ट्रेडिंग कंपनीचे रारे (Rare) चे मालक होते. एप्रिल ते जून 2022 रोजीच्या तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओत एकूण 47 कंपन्या होत्या. स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड्स, कॅनेरा बँक, फोर्टिस हेल्थकेअर, रॅलिस इंडिया, फेडरल इंडिया हे प्रमुख समूह त्यांच्या पोर्टफोलिओत होते.