Rakesh Jhunjhunwla | राकेश झुनझुनवाला खुर्चीत बसले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे होते समोर, या भेटीचा किस्सा तुम्हाला माहिती आहे का?
Rakesh Jhunjhunwla | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्या भेटीनंतर समाज माध्यमांसह राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा रंगल्या होत्या. ही बैठक 5 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीत झाली होती. यावेळी त्यांची पत्नीही उरपस्थित होती.
Rakesh Jhunjhunwla | शेअर बाजारातील (Share Market) दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी सकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या आर्थिक जगताला, उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. तसेच नवख्या आणि मुरलेल्या गुंतवणूकदारांचा ही मोठा आधार हिरवला आहे. त्यांच्या वडिलांचा आणि मित्रांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. बाजारात कोणीच किंग (King) नसतो, तर बाजार हाच किंग असतो, बाजारात जो राजा होण्याचा प्रयत्न करतो, त्याचा पुढचा मु्क्काम ऑर्थर रोड तुरुंग राहतो. ही त्यांची काही वाक्य गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. त्यांच्या निधन वार्ताने सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षी कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी या भेटीच्या एका फोटोवर बरीच चर्चा झाली होती. यामध्ये राकेश झुनझुनवाना खुर्चीवर बसलेले दिसत होते आणि पीएम मोदी त्यांच्यासमोर आदराने उभे असल्याचे दिसत होते.
पत्नी ही उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांची ही भेट 5 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीत झाली. यावेळी त्यांची पत्नीही झुनझुनवालासोबत होत्या. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. या छायाचित्रात राकेश झुनझुवाला यांचा सदरा, शर्ट प्रेस न केलेले दिसत होते. तर एका छायाचित्रात ते खुर्चीत बसलेले दिसत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर आदराने उभे असल्याचे दिसत आहेत.
‘वन अँड ओन्ली राकेश झुनझुनवाला’
झुनझुनवालाचा हा फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले, ‘One And Only राकेश झुनझुनवाला यांना भेटून आनंद झाला. भारताविषयी त्यांचा आशा अत्यंत जीवंत आहेत आणि ते आशावादी आणि दूरदर्शी आहेत. या छायाचित्रांवर नंतर चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या. सोशल जगतात तरुण, व्यावसायिक, राजकर्त्यांनी या फोटोवर त्यांच्या दृष्टिकोनातून शब्द लिहिले. @Nagesh_nsui6 या ट्विटर वापरकर्त्याने तर लिहिले की, ‘तुम्ही एखाद्या पंतप्रधानाला उद्योगपतीसमोर असे उभे राहिलेले पाहिले आहे का? त्याचवेळी हा मुद्दाही विरोधकांनी लावून धरला होता. राकेश झुनझुनवाला हे भविष्यातील केतन पारेख किंवा हर्षद मेहताही असू शकतात, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरोप करत, याप्रकरणात काय होणार, हे काळ आणि कायदा ठरवेल, असे ते म्हटले होते.
Rakesh Jhunjhunwala was indomitable. Full of life, witty and insightful, he leaves behind an indelible contribution to the financial world. He was also very passionate about India’s progress. His passing away is saddening. My condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/DR2uIiiUb7
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022
प्रत्येकाचे वेगळे दावे
या छायाचित्रावर आणि भेटीवर प्रत्येकाने मते मांडली. एका युझर्सने राकेश झुनझुनवालाची तब्येत बरी नसल्याचा दावा केला होता. तसेच ते व्हील चेअरच्या मदतीने काम करत असल्याचा दावा केला होता. त्यांची तब्येत चांगली नसल्याने त्यांनी मोदी यांच्या भेटीवेळी ते खुर्चीमध्ये बसून असल्याचा एकाने दावा केला होता. आज सकाळी 14 ऑगस्ट 2022 रोजी राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. एका रिपोर्टनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे गेल्या 25 वर्षांपासूनचे मित्र महेंद्र दोषी यांनी झुनझुनवाला हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांची किडनीही निकामी झाल्याचे सांगितले.