Rakesh Jhunjhunwla | बिग बुल राकेश झुनझुनवालांचे गुरु कोण? कोणी शिकवला कमाईचा मंत्र? त्यांच्यावर प्रभाव टाकणारे या आहेत नामी व्यक्ती
Rakesh Jhunjhunwla | भारताच्या शेअर बाजारतील वॉरेन बफेट, राकेश झुनझुनवाला ज्या शेअर्सवर हात ठेवायचे तो स्पीडने पळायचा. बाजारातील या बिग बुलवर कोणाचा प्रभाव होता माहिती आहे का?
Rakesh Jhunjhunwla | भारताचे वॉरेन बफे (Warren Buffet) शेअर बाजारातील बिग बुल (Big Bull) अशी ओळख निर्माण करणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांना कोण ओळखत नाही. ते ज्या शेअरला हात लावतात, त्या शेअरचे नशीब पार पलटून जाते. तो शेअर उच्चांक नोंद करतो हे एव्हाना सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक नवतरुण आणि मुरलेले गुंतवणूकदार त्यांच्या टिप्सचे अनुसरण करतात. ते कोणत्या शेअरमध्ये (Share Market) गुंतवणूक करत आहेत, कोणत्या शेअरमधून त्यांनी काढता पाय घेतला, या सर्वांची खडानखडा माहिती मिळावी यासाठी अनेक जण रोज प्रयत्नरत रहायचे. अर्थात त्यांनी ही कधी हातचे राखून ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या अनेक स्ट्रॅटर्जी गुंतवणूकदारांसाठी मुक्त हस्ताने दिल्या. शेअर बाजारातील अनेकांची उमेद असणाऱ्या राकेश झुनझुनवालांवर नेमका प्रभाव कोणाचा होता, त्यांचे मार्केटमधील गुरु (Market Guru) कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बाजारात झुनझुनवालाचा गुरू किंवा शिक्षक कोण हे फार कमी लोकांना माहीत असेल? खुद्द राकेश झुनझुनवाला यांनीच याबाबत खुलासा केला होता. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले गुरू कोण हे सांगितले होते. गुरूकडून मिळालेल्या शिक्षणाने त्यांना आज यशाच्या या शिखरावर पोहोचवल्याची प्रामाणिक प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली होती.
राकेश झुनझुनवाला यांचे गुरू कोण ?
राकेश झुनझुनवाला यांनी त्यांचा जीवनपट उलगडला. त्यावेळी आयुष्यात अनेक लोकांची साथ मिळाल्याची त्यांनी प्राजंळ कबुली दिली. त्यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव त्यांच्या वडिलांचा होता. वडिलांच्या गुरुमंत्राने त्यांनी मार्केटमध्ये पाय ठेवला होता. बाजारात गुंतवणूक करायची असेल तर स्वतःच्या कमाईने करायची हा गुरुमंत्र त्यांनी कसोशिने पाळला. वडिलांनीच त्यांना जीवनमूल्ये समजावून सांगितली. त्याच्या वडिलांनी मोठे निर्णय घेण्यात मदत केली. मोठे निर्णय घेताना संकोच करू नये,असे वडिल नेहमी आपल्याला सांगायचे असे त्यांनी आठवणीत रमताना सांगितले. त्यांच्या वडिलांव्यतिरिक्त त्यांचे इतर गुरु राधाकिशन दमानी आणि रमेश दमानी आहेत. आयुष्यातील कटुप्रसंगात या दोघांनी त्यांना योग्य मार्ग दाखवला.
राधाकिशन दमाणी हे अब्जाधीश गुंतवणूकदार
राधाकिशन दमाणी यांची गणना देशातील मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. ते केवळ गुंतवणूकदारच नाही तर मोठे उद्योजक, उद्योगपती ही आहेत. शुन्यातून त्यांनी विश्व उलगडले आहे. तुम्हाला डी-मार्ट मॉल (D-Mart Mall) माहिती आहेच. तर दमाणी हे या रिटेल चेन मार्केटचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी मोठ्या परिश्रमाने हा उद्योग उभाच केलेला नाही तर प्रस्थापित ही केला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, ते जगातील 122 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 11.9 अब्ज डॉलर आहे. भारतीय श्रीमंतात त्यांचा सहावा क्रमांक लागतो.
कोण आहेत रमेश दमाणी?
रमेश दमाणी हे बीएसईचे (BSE) सदस्य आहेत. एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणूनही ते ओळखल्या जातात. रमेश दमाणी हे 1989 पासून शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे जेव्हा रमेश दमानी शेअर बाजारात उतरले तेव्हा सेन्सेक्स 800 च्या पातळीवर होता. 1989 च्या तुलनेत तो आता 60 पटीने चढला आहे. रमेश दमानी यांना दलाल स्ट्रीटचे नवाब म्हटले जाते.
यांचाही त्यांच्या जीवनावर प्रभाव
राकेश झुनझुनवाला यांच्या गुरूंची यादी त्यांच्याच मते इथे संपत नाही. तर त्यांच्या जीवनावर आणखी एका व्यक्तीचा प्रभाव आहे. ही व्यक्ती कमल काबरा आहे. कमल हे शेअर बाजारातील गुंतवणूकदारही आहेत. त्यांचे अकाली गेलेले मित्र राजीव शहा यांचा ही त्यांच्या जीवनावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यशासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असायची. त्यांना माहिती होते की यश मिळवणे अगदीच सोपे नाही. मित्रांसह गुरुंसोबत ते सातत्याने चर्चा करीत असत.
त्यांचा यशाचा मंत्र काय आहे?
राकेश झुनझुनवाला यांच्या दाव्यानुसार, 1988 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी रुपये होती. जी 1993 मध्ये वाढून 200 कोटी झाली. मग हा वेग पाहता, 2000 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 800 कोटींवर पोहचणे अपेक्षित होते. पण हा अंदाज खरा नव्हता, 2002 मध्येही त्यांची मालमत्ता केवळ 250 कोटी इतकीच होती. त्यांच्या पोर्टफोलिओपैकी 5 टक्के गुंतवणूक कर्ज साधनांमध्ये गुंतवली होती. सप्टेंबर 2001 ते सप्टेंबर 2003 या दरम्यान, त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओपैकी 40 टक्के रक्कम कर्ज साधनांमध्ये गुंतवली होती. आज राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 18 हजार कोटींहून अधिक झाली आहे.