Rekha Jhunjhunwla : राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नीने रचला नवा विक्रम, पहिल्यांदा या यादीत पटकावले स्थान

Rekha Jhunjhunwla : राकेश झुनझुनावाला यांच्या पत्नीने नवीन इतिहास रचला आहे.

Rekha Jhunjhunwla : राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नीने रचला नवा विक्रम, पहिल्यांदा या यादीत पटकावले स्थान
नवीन विक्रम Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 6:08 PM

नवी दिल्ली : देशाच्या शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनावाला (Rakesh Jhunjhunwla) यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwla) यांनी यंदाच्या फोर्ब्स इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes India Rich list 2022) नाव नोंदवलं आहे. त्यामुळे त्यांनी ही नवीन विक्रम केला आहे.

रेखा झुनझुनवाला यांनी पतीची जागा घेतली आहे. देशाच्या अरबपतींच्या यादीत झुनझुनवाला यांनी 30 वे स्थान पटकावले आहे. 59 वर्षाच्या रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती (Rekha Jhunjhunwla Net Worth) 47,650.76 कोटी रुपये (5.9 अरब डॉलर) आहे.

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियो मध्ये टायटन, स्टार हेल्थ अँड एलाइड इन्शुरन्स तसेच मेट्रो ब्रँडसचा समावेश आहे. भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यावेळी त्यांचे वय 62 वर्ष होते.

हे सुद्धा वाचा

दिग्गज गुंतवणूकदार झुनझुनावाला यांनी शेअर बाजारात त्यांच्या कौशल्याने 37 वर्षांत आपली एकूण संपत्ती 5 हजार रुपयांनी वाढवून 5.5 बिलियन डॉलर केली. त्यांच्या गुंतवणुकीवर बाजारातील गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष होते.

फोर्ब्सच्या 2021 च्या अरबपतींच्या यादीनुसार, त्यांना भारताच्या 36 व्या सर्वात श्रीमंत व्यक्तींचे स्थान मिळाले होते. गेल्या वर्षी, त्यांनी 18 क्रमाकांची झेप घेत 36 वे स्थान पटकावले होते. यंदा त्यांच्या पत्नीने या यादीत आघाडी घेतली आहे.

राकेश झुनझुनवाला अनेक दिवसांपासून आजारी होते. ते सार्वजनिक कार्यक्रमात अनेकदा व्हिलचेअरवर दिसले. राकेश झुनझुनवाला यांना हृदय रोग आणि अन्य आजारपण होते. आजारपण वाढल्याने, त्यांचे 14 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.

अकासा एअरलाईन सुरु झाल्यानंतर एकाच आठवड्यात त्यांचे निधन झाले. राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांना तीन अपत्य आहेत. मुलगी निष्ठा, तर जुळे मुलं आर्यमन आणि आर्यवीर असा हे पंचकोनी कुटुंब होते.

फोर्ब्स इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणी शीर्षस्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 150 अरब डॉलरची आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी असून त्यांची एकूण संपत्ती 88 अरब डॉलर आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.