Rakesh Jhunjhunwla | मृत्यू, हवामान आणि बाजाराची भविष्यवाणी, काय म्हणाले होते राकेश झुनझुनवाला?

Rakesh Jhunjhunwla | शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी मृत्यू, हवामान आणि बाजाराची भविष्यवाणी केली होती. काय म्हणाले होते झुनझुनवाला?

Rakesh Jhunjhunwla | मृत्यू, हवामान आणि बाजाराची भविष्यवाणी, काय म्हणाले होते राकेश झुनझुनवाला?
मृत्यू, बाजार आणि स्त्रीचा स्वभावImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 12:18 PM

Rakesh Jhunjhunwla | शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरेन बफेट (Warren Buffet) असे संबोधले जायचे. त्यांच्या निधनाच्या बातमीने गुंतवणूकदार, उद्योज जगताला मोठा धक्का बसला. त्यांच्या विमान वाहतूक कंपनीच्या विमानाने नुकतेच पहिले उड्डाण केले होते. त्यावेळी त्यांनी व्यवसायात धोके असले तरी तो कसे यशस्वी करता याचे एक उदाहरण तयार करायचे असल्याचा मनोदय व्यक्त केला होता. मुंबई-अहमदाबाद या मार्गावर त्यांच्या अकासा (Akasa Airlines) या एअरलाईन्सने पहिले टेक-ऑफ केले होते. त्यानंतर त्याच्या विस्ताराची योजना तयार करण्यात आली होती. त्यांच्या एअरलाइन्स कंपनीने 7 ऑगस्टपासून काम सुरू केले. आज त्याच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. एवढी संपत्ती असलेल्या व्यक्तीचा प्रवास अवघ्या 5 हजार रुपयांपासून सुरू झाल्याचे तुम्हाला सांगितल्यास तुमचाही विश्वास बसणार नाही. शेअर बाजारात कोणीच राजा (Share Market King) नसतो हे त्यांचे वाक्य अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या कार्यालयात दर्शनी भागात लावलेले आहे.

हे वाक्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय

शेअर बाजारात कोणीच राजा (Share Market King) नसतो हे त्यांचे वाक्य सर्वाधिक लोकप्रिय आणि बाजाराची वस्तूस्थिती दर्शवणारे आहे. बाजारात कोणीच किंग होऊ शकत नाही. ज्याने हा प्रयत्न केला, त्याची काय अवस्था झाली याचे दाखले गुंतवणूकदारांना द्यायची गरज नाही. ज्यांनी शेअर बाजारात राजा होण्याचा प्रयत्न केला, त्यांचा पुढचा मुक्काम ऑर्थर रोड जेल असल्याचे त्यांनी सांगितले होते. बाजाराच स्वतः राजा असल्याचे त्यांनी छातीठोकपणे नमूद केले होते. त्यांच्या डोक्यात कधीच मार्केटची हवा गेली नाही. ते कायम जमिनीवर राहिल्याचे दिसून आले.

या तीन गोष्टींचा काय भरवसा?

हवामान, मृत्यू, बाजारपेठ आणि स्त्रीचा स्वभाव पुढील क्षणी कोणतं वळण घेईल, याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. हे त्यांचे आणखी एक वाक्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होतं. बाजार हा स्त्रीसारखा आहे. तो नेहमीच गूढ असतो. तो नेहमी अस्थिर असतो. अस्थिरता हाच शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. स्त्रीवर जसे तुम्ही कधीच वर्चस्व गाजवू शकत नाही. तसेच बाजारावर ही तुम्ही वर्चस्व ठेऊ शकत नाही असे ते म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

नुकताच साजरा झाला वाढदिवस

राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी वाढदिवस साजरा केला. झुनझुनवाला यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं की, त्यांनी मातीला जरी स्पर्श केला तरी तीचं सोनं होईल. राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला. अवघ्या 5,000 रुपयांसह, सुरु झालेला हा प्रवास आज 18 हजार कोटींहून अधिक आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर, गुंतवणूकीवर, नियोजनावर गुंतवणूकदारांची बारीक नजर असायची.

स्टॉक्स निवडताना ते चोखंदळ होते. ज्या स्टॉकवर कोणाचे लक्ष नसायचे तिथे ते गुंतवणूक करायचे. ज्या स्टॉकमध्ये त्यांनी गुंतवणूक केली त्याने छप्परफाड कमाई केली, हे अनेकदा सिद्ध झाले. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा 40 वर्षांहून अधिक अनुभव होता. गुंतवणूकदारांनी त्याच्या टिप्स पाळल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.