सॅम ऑल्टमन याची पुन्हा घरवापसी? आला OpenAI कंपनीच्या संचालक मंडळावर दबाव

OpenAI Sam Altman | कृत्रिम बुद्धीमता प्रकल्पांमुळे चर्चेत आलेल्या OpenAI कंपनी वादळात सापडली आहे. संचालक मंडळाने काल सीईओ सॅम ऑल्टमन याला पदावरुन काढले होते. त्यानंतर आता त्याला परत सीईओ पदी घेण्यासाठी मंडळावर दबाव आला आहे. सॅमसाठी या लोकांनी मोर्चेबांधणी केली आहे. काय आहे प्रकरण..

सॅम ऑल्टमन याची पुन्हा घरवापसी? आला OpenAI कंपनीच्या संचालक मंडळावर दबाव
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 9:16 AM

नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : कृत्रिम बुद्धीमतेमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती जगभरात व्यक्त होत आहे. त्याला कारणीभूत OpenAI आणि तिची उपकंपनी ChatGPT ही कंपनी आहे. पण या कंपनीचा सीईओ सॅम ऑल्टमन यालाच कंपनीच्या संचालक मंडळाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली. लागलीच या कंपनीचा अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन याने पण पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. हे दोघेही या नवतंत्रज्ञानाचे प्रणेते आहे. पण त्यांच्यावरच परागंदा होण्याची वेळ आली. आता कहाणीत पुन्हा ट्विस्ट आला आहे. सॅम ऑल्टमन याला पुन्हा सीईओ करण्यासाठी गुंतवणूकदारांनी संचालक मंडळावर दबाव आणला आहे.

असा घडला घटनाक्रम

चॅटजीपीटीचे सीईओ आणि सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांच्यावर ओपनएआय कंपनीचे संचालक मंडळ नाराज होते. त्याच्यावर भरवसा उरला नसल्याचे कारण त्यांनी दिले. तो अनेक निर्णयात लक्ष देत नसल्याचे खापर संचालक मंडळाने फोडले होते. याविषयीचे निवदेन प्रसिद्ध करत त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले. ओपनआयला एकापाठोपाठ दोन झटके बसले.

हे सुद्धा वाचा

तुमचा निर्णय फिरवा

सॅम याला परत माघारी बोलविण्यासाठी मोठं-मोठ्या गुंतवणूकदारांनी ओपनएआयच्या संचालक मंडळावर दबाव आणला आहे. Thrive Capital ही सर्वात मोठी गुंतवणूक फर्म आहे. या फर्मने तर संचालक मंडळाला निर्णय फिरवण्यास सांगितले आहे. त्यांनी सॅम ऑल्टमन याला पुन्हा पदावर बसविण्यासाठी दबाव टाकला आहे. Tiger Global Management या गुंतवणूकदार संस्थेने पण सॅमसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

माघारी बोलवा अन्यथा परिणाम भोगा

यातील काही मोठे शेअरहोल्डर आक्रमक झाले आहे. त्यांना सॅम ऑल्टमन याला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय रुचला नाही. सॅमला तातडीने माघारी बोलवा. त्याला पुन्हा सीईओ करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा इशाराच या तगड्या गुंतवणूकदारांनी ओपनएआय कंपनीच्या संचालक मंडळाला दिला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी पण सॅम ऑल्टमन याची बाजू उचलून धरली आहे. संचालक मंडळावर हे प्रकरण चांगलेच शेकण्याची चिन्हं दिसत आहे. संचालक मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....